खुशखबर! २०२०-२१ मध्ये १०० कोटी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचणार; रशियाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 09:41 AM2020-09-13T09:41:02+5:302020-09-13T09:56:34+5:30
जगातली पहिली वॅक्सिन स्पुतनिक व्ही लस पहिली टप्प्यातील लसीकरणात नागरिकांना लस दिली जाणार आहे.
संपूर्ण जगभरातील लोक कोरोना लसीच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे. रशियाात कोरोना लसीचे डोज नागरिकांना देण्यास सुरूवात झाली आहे. जगातली पहिली वॅक्सिन स्पुतनिक व्ही लस पहिली टप्प्यातील लसीकरणात नागरिकांना लस दिली जाणार आहे. एका रिपोर्टनुसार रशियानं घोषणा केली आहे की २०२०-२१ मध्ये एक बिलियन म्हणजेच १०० कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सनं इंटरफॅक्सवृत्त संस्थेच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. या लसीबाबत अधिक माहिती तुम्हाला सांगणार आहोत.
रशियातील आरडीआयएफनं ब्राजीलसह इतर देशांमध्ये लसीच्या निर्यात करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या व्यतिरिक्त कजाकिस्तानसोबतही करार करण्यात आला आहे. सुरुवातीला २० लाखपेक्षा अधिक लसीचे खुराक खरेदी करण्यासाठी तयार असून नंतर ५० लाख डोज मागवण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार भारतात रशियन लसीचे ३० कोटी डोज उत्पादित केले जाणार आहेत. या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अजूनही पूर्ण झालेली नाही. या महिन्यात या लसीची चाचणी भारतात होणार आहे. रशियनन डायरेक्टर इनवेस्टमेंट फंडाचे सीईओ किरिल दिमित्रिव यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतासह संयुक्त अरब, सौदी अरब, फिलीपींस आणि ब्राजिलमध्ये या महिन्यापासून चाचणीला सुरूवात होणार आहे.
ब्लादिमीर पुतिन यांनी ११ ऑगस्टला स्पुतनिक व्ही ही लस लॉन्च केली होती. याशिवाय या लसीच्या परिणामकारकतेबाबतही सांगण्यात आले होते. ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असून त्यांनी आपल्या मुलीलाही ही लस दिल्याचा दावा केला होता. ही लस मॉस्कोतील गमलेया रिसर्च इंन्स्टिट्यूटनं विकसित केली आहे. वैद्यकिय नियतकालिक लेसेंटमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार सुरूवातीच्या ट्रायल दरम्यान ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. ही लस घेतल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात एंटीबॉडीज तयार झाल्या आल्या.
IMAचं ठरलं! आता खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर 'एवढ्या' रुपयांत होणार उपचार
खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवरच्या उपचाराचे दर शासनाने निश्चित केले आहेत. एका दिवसात एका पेशंटला जास्तीत जास्त 15 हजार रुपये उपचारासाठी मोजावे लागतील. कोणतेही रुग्णालय निश्चित दरापेक्षा रुग्णांकडून अधिक शुल्क आकारू शकणार नाही.
दिवसाला फक्त 15 हजार रुपये रुग्णांना द्यावे लागणार
यापूर्वी सरकारने दोन श्रेणीतील रुग्णांची फी दररोज आठ आणि 13 हजार रुपये निश्चित केली होती. ठिकठिकाणी फीपेक्षा जास्त पैसे घेतल्याच्या बर्याच ठिकाणी तक्रारी आल्या. आता सरकारने शुल्क तीन श्रेणींमध्ये निश्चित केले आहे. 15 हजार रुपये जास्तीत जास्त आहे. ज्यांची तब्येत कमी खराब आहे आणि त्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी दिवसातून आठ आणि 13 हजार रुपये दर निश्चित केले गेले आहेत. या दरात बीपी आणि शुगरवरही उपचार केले जातील. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने दर निश्चित केले असून, खासगी रुग्णालयांना आता ठरविलेल्या शुल्कावर रुग्णावर उपचार करावे लागणार आहेत.
रुग्णांनाही ही सुविधा मिळणार
पॅनेसियाचे डॉक्टर अजय शुक्ला म्हणाले की, लक्षणे नसलेल्या आठ हजार रुग्णांकडून सरकारने ठरविलेले दर घेतले जातील. त्यांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजनची सुविधा पुरविली जाईल. आयसीयू सुविधा रुग्णांना 13 हजार रुपयांना देण्यात येणार आहे. 15 हजार रुपयांना आयसीयूसह व्हेंटिलेटरची सुविधा देण्यात येणार आहे. या दरामध्ये रुग्णांना जेवण, काही आवश्यक चाचण्या, औषध, नर्सिंग शुल्काचा समावेश असेल. सीएमओ डॉ. श्रीकांत तिवारी म्हणाले की, खासगी रुग्णालय कोरोना रुग्णांवर शासनाने निश्चित केलेल्या दराने उपचार करेल. त्यापेक्षा जास्त रुग्णांना पैसे द्यावे लागणार नाहीत.
इंजेक्शनसाठी स्वतंत्र पैसे द्यावे लागतील
शासनाने काही इंजेक्शन्स रुग्णांना देण्याचे दर निश्चित केले आहे, अशी माहिती डॉ. अजय शुक्ला यांनी दिली. त्यामध्ये रेमिडेसिव्हर आणि टोकलिझुमब यांचा समावेश आहे. हे इंजेक्शन आवश्यकतेनुसार रुग्णांना दिले जाईल. परंतु यासाठी त्यांना स्वतंत्र पैसे मोजावे लागतील. सरकारने ही इंजेक्शन पॅकेजमध्ये जोडलेली नाहीत. एखादा रुग्ण किडनीसह गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर आयुष्मान योजनेतील लाभार्थ्यांना ठरलेल्या दराने त्याच्यावर उपचार केले जातील. त्यांच्याकडून जादा शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय कोरोना रुग्ण आयुष्मान योजनेस पात्र ठरल्यास त्यातून अधिक शुल्क घेतले जाणार नाही.
हे पण वाचा-
CoronaVirus News: ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरू; जाणून घ्या कधी लॉन्च होणार
CoronaVirus News : लढ्याला यश! स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा
CoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत