सतत बसून राहण्याचे हे आहेत गंभीर तोटे, असे करा उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 06:05 PM2018-04-04T18:05:15+5:302018-04-04T18:05:15+5:30
एका रिपोर्टनुसार, आपल्यापैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त लोक पायावर उभेच राहत नाहीत. हे लोक एकतर 18 तास बसलेले असतात नाहीतर लेटलेले असतात.
तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण केवळ सतत बसून राहिल्यानेही कधीही बरा न होणारा आजार होण्याची शक्यता असते. स्मोकिंग करण्या इतकंच घातक बसून रहाणं आहे. मेडिकल जर्नल लॅंसेटमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, रोज एक 11 तास किंवा त्यापेक्षा जास्तवेळ तुम्ही बसत असाल तर तुमच्या मृत्यूची शक्यता 40 टक्के अधिक वाढते.
एका रिपोर्टनुसार, आपल्यापैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त लोक पायावर उभेच राहत नाहीत. हे लोक एकतर 18 तास बसलेले असतात नाहीतर लेटलेले असतात. आता लोक आधीच्या तुलनेत अधिक टीव्ही बघतात, कुणी ऑफिसमध्ये बसलेले असतात तर कुणी कारमध्ये बसलेले असतात.
तरीही आपण स्वत:लाच खोटा दिलासा देत असतो की, आपण एक व्यस्त जीवन जगत आहोत. महत्वाची बाब म्हणजे ज्याप्रकारे स्मोकिंगचे वाईट परीणाम व्यायामाने दूर करता येत नाहीत. त्याचप्रमाणे जास्त वेळ बसल्याने येणारी नकारात्मकता दूर केली जाऊ शकत नाही. अशात तुम्हाला किती वेळ उभे रहायला हवे?
काय म्हणतात डॉक्टर?
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, दोन तास बसण्यापेक्षा उभे राहण्याला प्राधान्य द्याल तर तुमच्या ब्लड शुगर कोलेस्ट्रोल लेव्हलमध्ये सुधार होऊ शकतो. आणि बसण्यापेक्षा चालण्याचा फायदा तुमच्या कमरेचा वाढलेला घेर कमी करण्यासाठीही होऊ शकतो. रोज उभे राहिल्यास ब्लडमध्ये वाढलेला फॅट्सचा स्तरही 11 टक्के कमी होतो.
जास्त वेळ राहा उभे
उभे राहिल्याने हार्ट बीट रेट साधारण दहा बीट प्रति मिनिटे वाढतो. ज्यामुळे प्रति तासात 60 कॅलरीज बर्न होतात. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, प्रत्येक तासाला केवळ पाच मिनिटे काहीही न करता उभे राहिल्याने आणि चालण्याने एका महिन्यात 2 हजार 500 पेक्षा जास्त कॅलरी बर्न केल्या जाऊ शकतात.
आणखी काय करता येईल?
उभे राहण्यासाठी कारण शोधत असाल तर बागेत किंवा अंगणात पाईपने पाणी देण्याऐवजी कॅनने द्या. ऐकायला जरा विचित्र वाटेल पण टीव्ही उभ्याने बघा. ऑफिसला जाताना बस किंवा ट्रेनमध्ये सीटवर बसू नका. जास्त पाणी प्या. याने तुम्हाला सतत लघवीसाठी जागेवरुन उठावं लागेल. फोन कॉल आला असेल तर बोलण्यासाठी उभे राहा. तुमची कार तुम्ही पार्कींगमध्ये सर्वात शेवटी पार्क करा, जेणेकरुन तुम्हाला चालायला संधी मिळेत.
स्टॅंडींग डेस्क
सध्या याबाबत सगळीकडेच चर्चा रंगली आहे. कारण याचे आरोग्यदायक अनेक फायदे आहेत. या डेस्कला तुमच्या उंचीनुसार अॅडजस्ट केलं जाऊ शकतं. जर तुम्ही उभे राहून थकलेच तर खुर्ची घेऊन बसा. तुम्हाला एका तासात केवळ 10 मिनिटे उभे राहण्याची गरज आहे.