फ्लॉप चित्रपटांमुळे त्रस्त झालेत स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:12 AM2016-01-16T01:12:39+5:302016-02-06T13:26:14+5:30

या शुक्रवारी प्रदर्शित होणार्‍या तमाशा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण ही ज...

Stars troubled by flops | फ्लॉप चित्रपटांमुळे त्रस्त झालेत स्टार्स

फ्लॉप चित्रपटांमुळे त्रस्त झालेत स्टार्स

Next
 
माशा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण ही जोडी लोकमतच्या मुंबई कार्यालयात आली होती. यावेळी रणबीरला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामुळे तो थोडा उदास झाला. तुझे मागील तीन प्रदर्शित चित्रपट बॉक्स ऑफिसवर का चालले नाही, असा हा प्रश्न होता. यावर रणबीर म्हणाला, मागील तीन चित्रपट अपयशी ठरले हे खरे आहे. म्हणूनच तमाशा चित्रपटाबाबत मला थोडा प्रेशर जाणवत आहे. रणबीर कपूरचा हा दबाव विनाकारण नाही.

जेव्हा सलग तीन मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप झाले तर मोठमोठय़ा स्टार मंडळींना असे टेंशन येतेच. तसे पाहता रणबीर कपूरच्या कॅरिअरची सुरुवातच फ्लॉप चित्रपटाने झाली होती. शाहरुख खानच्या ओम शांती ओमच्या स्पर्धेवेळी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरचा पहिला चित्रपट सांवरियाने बॉक्स ऑफिसवर 'पाणीही मागितले नव्हते' आणि ओम शांती ओम सोबत हा सामना एकतर्फी झाला होता.

बॉलिवूडचा इतिहास सांगतो की, जवळपास सर्वच मोठय़ा स्टार मंडळींनी सलग फ्लॉप चित्रपटांचा काळ सहन केला आणि नंतर ते यशाच्या मार्गावर परतले. जास्त दूर न जाता सध्याच्या स्टारलाच पाहिले तर ही गोष्ट लक्षात येते. रणबीर कपूर प्रमाणे शाहिद कपूरदेखील मोठय़ा काळापासून फ्लॉप चित्रपटांचा मार सहन करीत आहे. जब वी मीटच्या यशानंतर शाहिद फ्लॉप-हिट चित्रपटांमध्ये गुंतला आहे. मौसम, आर. राजकुमार, फटा पोस्टर निकला हीरो आणि हैदर नंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शानदारच्या अपयशाने जसे त्यांची कंबरच तोडली आहे.

हृतिक रोशनने देखील फ्लॉप चित्रपटांचा मोठा काळ पाहिला आहे. कहो न प्यार है नंतर हृतिक रोशनचे कॅरिअर फ्लॉप चित्रपटांच्या संकटांनी वेढले गेले. यादें, आप मुझे अच्छे लगने लगे, मैं प्रेम की दीवानी, मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटांमुळे त्याच्या कॅरिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. भले हो त्याचे वडील राकेश रोशनचे, ज्यांनी प्रथम कोई मिल गया आणि नंतर क्रिशच्या मालिकेद्वारे आपल्या मुलाला या संकटातून बाहेर काढण्यात यश मिळविले. यामध्ये सलमान खानचे उदाहरणदेखील दिले जाऊ शकते. 

Web Title: Stars troubled by flops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.