स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात

By admin | Published: July 31, 2015 10:25 PM2015-07-31T22:25:15+5:302015-07-31T22:25:15+5:30

स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात

Start of preventive immunization of swine flu | स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात

स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात

Next
वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात
- डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय : १२ गर्भवती महिलांना दिली लस

(स्वाईन फ्लूचा लोगो वापरावा)

नागपूर : गेल्या वर्षी स्वाईन फ्लूच्या उद्रेकामुळे एकट्या नागपूर विभागात ६०१ रुग्ण तर १२५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. गर्भवती महिलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी राहत असल्याने या आजाराला ते लवकर बळी पडायचे. मागील वर्षी सुमारे दहावर गर्भवतींचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला होता, याची दखल घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने यावर्षी पहिल्यांदाच डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाला स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक १२०० लस पाठविल्या आहेत. रुग्णालयाने शुक्रवारी याचा शुभारंभ करीत १२ गर्भवती महिलांना ही लस दिली.
उपराजधानीत २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. २०१२ व २०१३ मध्ये कमी रुग्णांची नोंद झाली होती. यामुळे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले होते. परंतु २०१४ मध्ये याचा उद्रेक होताच प्रशासन खडबडून जागे झाले. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देण्यात येणारी लस योग्य नसल्याचा दावा करीत उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. मात्र, या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या तोंडावरच सार्वजनिक आरोग्य विभागाने साईन फ्लूची प्रतिबंधात्मक लस उपलब्ध डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाला उपलब्ध करून दिली आहे. गर्भवतींना स्वाईन फ्लूच्या साथीची लागण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शुक्रवारी गर्भवतींना स्वाईन फ्लूची लस देण्यात आली.
-२०१० मध्ये नाकारली होती लस
तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. सुरेश शेट्टी यांनी २०१० मध्ये स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस गर्भवती महिलांना देण्याबाबत कोणताही निर्णय राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने घेतला नसल्याचे सांगितले होते. गर्भवती महिला व तिच्या बाळाच्या आरोग्याचा विचार केंद्रस्थानी ठेवून हा निर्णय घेतल्याचा त्यावेळी सांगण्यात आले होते.
-पहिल्यांदाच १२०० लस उपलब्ध
सार्वजनिक आरोग्य विभागाने या वर्षी राज्यातील आठ रुग्णालयांसह डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाला स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून दिल्या आहेत. यात डागा रुग्णालयाला १२०० लस मिळाल्या आहेत. ही लस प्रतिबंधात्मक आहे. त्यामुळे या रोगाच्या विषाणूंना प्रतिकार करण्याची क्षमता शरीरात निर्माण होते.

Web Title: Start of preventive immunization of swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.