ॅविविध रुग्णालयात शस्त्रक्रियांना प्रारंभ महाआरोग्य शिबिर: तज्ज्ञांची उपस्थिती
By admin | Published: January 9, 2016 11:23 PM2016-01-09T23:23:45+5:302016-01-09T23:23:45+5:30
जळगाव : महाआरोग्य शिबिरात पहिल्या दिवशी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय, ऑर्किड, गणपती व जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध शस्त्रक्रियांना प्रारंभ झाला.
Next
ज गाव : महाआरोग्य शिबिरात पहिल्या दिवशी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय, ऑर्किड, गणपती व जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध शस्त्रक्रियांना प्रारंभ झाला. महाशिबिरांतर्गत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात सकाळी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दाखल झाले. पहिल्या दिवशी दोन बायपास, ५ ॲँजिओप्लास्टी व प्रकारच्या जवळपास १०० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. नाशिक येथील डॉ. नितीन काळे, कल्याण मुंडे यांनी शस्त्रक्रिया केल्या. हजारो रुग्णांनी रुग्णालयावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सज्ज असून विविध सुविधा रुग्णाना पुरविल्या जातील असे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. ऑर्किड रुग्णालयऑर्किड रुग्णालयात एक बायपास, ५ ॲँजिओग्राफी, ३ ॲँजिओप्लास्टी डॉ. रणजित जगताप यांनी केल्याची माहिती डॉ. परेश दोशी यांनी दिली. ५०० रुग्ण दाखलजिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र विषयक व लहान मुलांच्या ५०० शस्त्रक्रिया रविवारी होतील. नेत्र विषयक शस्त्रक्रिया डॉ. तात्याराव लहाने हे करणार असल्याचे प्रभारी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.