सकाळी रिकाम्या पोटी या 3 हेल्दी ड्रिंक्सने करा दिवसाची सुरूवात, अनेक आजार होतील दूर...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 01:59 PM2024-04-12T13:59:14+5:302024-04-12T13:59:39+5:30
प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट लवनीत बत्रा यांनी उन्हाळ्यात सकाळी प्यावे अशा तीन हेल्दी ड्रिंकबाबत सांगितलं आहे.
जर सकाळ चांगली गेली तर तुमचा दिवसही चांगला जातो. सकाळी झोपेतून उठल्यावर जर तुमच्या चांगल्या गोष्टींनी सुरूवात केली तर आरोग्य चांगलं राहतं आणि दिवसही चांगला जातो. डॉक्टर नेहमीच सल्ला देतात की, सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी भरपूर पाणी प्या. त्यासोबत अशाही गोष्टी गोष्टी आहेत ज्याचं तुम्ही सकाळी सेवन केलं तर तुमचे अनेक आजार दूर होतील आणि तुम्ही निरोगी रहाल.
जास्तीत जास्त लोक दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफीने करतात. पण असं करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. डॉक्टरही असं न करण्यास सांगतात. अशात प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट लवनीत बत्रा यांनी उन्हाळ्यात सकाळी प्यावे अशा तीन हेल्दी ड्रिंकबाबत सांगितलं आहे. जर यांच रोज सकाळी सेवन केलं तर तुम्हाला खूप फायदा होईल.
उन्हाळ्यात सकाळी प्यावे असे पेय
1) नारळाचं पाणी
नारळाचं पाणी एक नॅचरल हायड्रेटर आहे जे पचन वाढवण्यास मदत करतं. याच्या सेवनाने तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. त्यासोबतच यातील अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात. तसेच याच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे रोज सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही याचं सेवन करावं.
2) आवळा-आल्याचा ज्यूस
1 चमचा आल्याच्या रसासोबत ताज्या आवळ्याचा 30 मिलीलीटर ज्यूस मिक्स करा. याच्या सेवनाने बदलत्या वातावरणात तुम्हाला शरीराचं रक्षण करण्यास मदत मिळते. या पेयाने हाय ब्लड शुगर स्थिर करण्यासही मदत मिळते. हे सकाळी प्यावं असं एक बेस्ट पेय आहे.
3) पांढऱ्या भोपळ्याचा ज्यूस
जर तुम्हाला सूज, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा अपचन अशा समस्या असतील तर तुम्ही रोज सकाळी पांढऱ्या भोपळ्याचा ज्यूस प्यायला हवा. याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पोटासंबंधी अनेक समस्या या ज्यूसमुळे दूर होतात. तसेच शरीरही दिवसभर थंड राहतं.