हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून दूर राहण्यासाठी !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2016 02:46 PM2016-12-14T14:46:51+5:302016-12-14T14:48:57+5:30
हिवाळा म्हटले म्हणजे सर्दी, खोकला, घसा खराब होेणे तसेच ताप आदी आजारांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. या ऋतूत हवेत जास्त आर्द्रता असते. त्यामुळे ८० टक्के संक्रमण हे थेट किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात होते.
Next
हिवाळा म्हटले म्हणजे सर्दी, खोकला, घसा खराब होेणे तसेच ताप आदी आजारांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. या ऋतूत हवेत जास्त आर्द्रता असते. त्यामुळे ८० टक्के संक्रमण हे थेट किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात होते. एका संशोधनानुसार जेव्हा आपण खोकतो किंवा शिंकतो त्यावेळी श्वास प्रणालीमधील घाण बाहेर पडते, जी की खूप लहान आकारात म्हणजे ५ मायक्रॉनपेक्षा कमी असते. त्यामुळे हवेमध्ये ती लवकर मिसळते. हे कण काहीच वेळ हवेमध्ये टिकतात आणि ३ फुटाच्या अंतरावर असलेल्या व्यक्तीच्या श्वास प्रणालीत जाऊन त्याला त्याचे संक्रमण होते. फ्लूमध्ये हे प्रमाण ६ फुटापर्यंत असू शकते. मेनिन्जायटिस, रूबेला ही कणामुळे होणाऱ्या संक्रमणाची उदाहरणे सांगता येतील.
ज्या घरांच्या खिडक्या नेहमी उघड्या असतात, त्या घरातील हवा शुद्ध राहते. ज्यामुळे संक्रमण होत नाही. परंतु, ज्या खोल्यामध्ये हवा येत नाही तिथे संक्रमण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होऊ शकते. खासकरुन हिवाळा जास्त असल्यावर संक्रमण थांबवण्यासाठी घरातील स्वच्छता महत्वाची असते.
कामाच्या ठिकाणी स्प्लिट एसी असेल, तर तिथेही संक्रमण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ज्यांना क्षयरोग, गोवर, कांजण्या, यांसारखे रोग झाले असतील अशा रुग्णांनी स्प्लिट एसीच्या ठिकाणी बसू नये.
६ ते १० फुटांवर असलेल्या व्यक्तीला सुरक्षेची गरज नाही. परंतु, संक्रमित व्यक्तीच्या ३ फुटांपेक्षा जास्त जवळ जात असाल, तर अशा वेळी मास्क घालणे आवश्यक आहे. क्षयरोग, गोवर, कांजण्या, यांसारखे रोग झाले असतील अशा व्यक्तींना आयसोलेशन खोलीत ठेवायला हवे आणि जे त्यांची सुश्रुषा करत असतील त्यांनी एन ९५ मास्क वापरायला हवे.
काय काळजी घ्याल
* आजारी व्यक्ती किंवा तुम्ही स्वत: आजारी असाल तर दुसºया व्यक्तीच्या जास्त जवळ जाऊ नका.
* आजारी असल्यावर घरीच आराम करा आणि दुसºयाला तुमच्या संक्रमणापासून दूर ठेवा.
* आपले नाक आणि तोंड झाकून ठेवा.
* साबण किंवा अँटीबायोटिकने आपले हाथ स्वच्छ धुवा.
* सार्वजनिक ठिकाणी कशालाही स्पर्श करू नका.
* स्वत:च्या चेहऱ्याला सारखा हात लावू नका.