२०२० मध्ये हेल्दी आणि फिट राहण्याचा करा संकल्प, फॉलो करा 'या' सोप्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 10:30 AM2019-12-27T10:30:34+5:302019-12-27T10:43:36+5:30

आरोग्य चांगलं राखण्याच्या आणि यशस्वी होण्याच्या अनेक शुभेच्छा नवीन वर्षाच्या निमित्ताने मिळत असतात. पण हेल्दी आणि फिट राहण्यासाठी आपण काय करतो?

Stay healthy in new year with these tips for good health | २०२० मध्ये हेल्दी आणि फिट राहण्याचा करा संकल्प, फॉलो करा 'या' सोप्या टिप्स!

२०२० मध्ये हेल्दी आणि फिट राहण्याचा करा संकल्प, फॉलो करा 'या' सोप्या टिप्स!

googlenewsNext

(Image Credit : telegraph.co.uk)

आरोग्य चांगलं राखण्याच्या आणि यशस्वी होण्याच्या अनेक शुभेच्छा नवीन वर्षाच्या निमित्ताने मिळत असतात. पण हेल्दी आणि फिट राहण्यासाठी आपण काय करतो? आता नव्या वर्षाला सुरूवात होणार आहे. या नव्यात तुम्ही फिट आणि हेल्दी राहण्याचा संकल्प करू शकता. जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहून तुम्हाला भरपूर यश मिळेल. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.

साधं खा, हेल्दी रहा

(Image Credit : heart.org)

हेल्दी राहण्याचा हा सर्वाच चांगला पर्याय आहे. जर तुम्ही फिट राहण्यासाठी फॅन्स आणि इम्पोर्टेड पदार्थांचं सवन करत असाल तर हे चुकीचं आहे. कारण हेल्दी शरीरासाठी आपल्या आजूबाजूला उपलब्ध फळे, भाज्या आणि हर्ब्सचं सेवन चांगलं राहतं. भौगोलिक स्थिती आणि वातावरणानुसार आपल्यासाठी निसर्ग सर्वच आवश्यक पोषक तत्व असलेला आहार उपलब्ध करून देते. जर स्थानिक पदार्थांचं सेवन कराल तर याने तुम्हाला पोषण मिळण्यास सोपं जाईल. 

पुरेशी झोप

(Image Credit : thriveglobal.com)

आपल्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली झोप. कारण चांगली झोप झाल्याने केवळ शरीराला आराम मिळतो असं नाही तर तणाव आणि डिप्रेशनपासून बचाव करण्यासही मदत मिळते. त्यामुळे अर्थातच कामावरही फोकस वाढतो. पण अनेकदा लोक काम जास्त करत बसणे, टीव्ही जास्त बघणे किंवा फोनवर बोलत बसणे यामुळे पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. अशात पुरेशी झोप घेण्यावर नव्या वर्षात लक्ष द्या.

कमी मीठ, कमी साखर आणि कमी तेल

वेगवेगळ्या लाइफस्टाईलसंबंधी होणाऱ्या समस्यांचं कारणं हे आहारातील मीठ, तेल आणि साखर यांचं अधिक प्रमाण ही आहेत. हृदयासंबंधी आजारही यामुळेच होतात. त्यामुळे आहारातून सोडिअमचं प्रमाण कमी करा, साखर कमी करा आणि फॅटचंही प्रमाण कमी करा. जास्त सोडिअममुळे हायपरटेंशन किंवा हाय ब्लड प्रेशरची समस्या होते.

(Image Credit : foodnavigator.com)

जास्त तेल किंवा फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने कर्डिओवॅस्क्युलर समस्या आणि साखरेच्या अधिक प्रमाणामुळे हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसची समस्या होऊ शकते. या आजारांपासून वाचण्यासाठी तुम्ही डाएटमधून सोडिअम, कोलेस्ट्रॉल आणि साखरेचं प्रमाण कमी करा. याने तुम्ही फिट रहाल आणि तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळेल.

घरगुती एक्सरसाइज

तुम्हाला जिमला जाण्याचा कंटाळा येत असेल किंवा वेळ मिळत नसेल तर तुम्ही घरीच सोप्या एक्सरसाइज करून फिट राहू शकता. तसेच चालण्याला आणि वेळ असेल धावण्याला प्राधान्य द्यावे. याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहिल आणि तुम्हाला हृदयासंबंधी समस्याही होणार नाहीत. 

फास्टफूड ठेवा दूर

बऱ्याच लोकांना आता फास्ट फूड खाण्याची सवय झाली आहे. पण फास्ट फूडमुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा किंवा समस्यांचा सामना करावा लागतो. यात सर्वात मोठी समस्या म्हणजे वजन वाढणे किंवा पोट बाहेर येणे. आता तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर फास्ट फूडची कुर्बानी तर द्यावीच लागेल. तेव्हाच तुम्ही वजन कमी करा. 


Web Title: Stay healthy in new year with these tips for good health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.