लोकांपासून दुर राहणे, लोकांमध्ये मिसळण्यास अडचण....ही आहेत 'या' डिसऑर्डरची लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 04:11 PM2021-07-02T16:11:06+5:302021-07-02T16:13:29+5:30
एखादी व्यक्ती सतत बोलत असेल की मला बोर वाटतंय तर मात्र ते काळजीचं कारण आहे. कारण हा एक विकारही असू शकतो. या विकाराला स्किजॉईड व्यक्तित्व विकार असे म्हणतात. हा आजार नेमका काय आहे त्याची लक्षणे काय याबद्दल आपण जाणून घेऊया.
जेव्हा एखादी व्यक्ती असं म्हणते की मला बोर होतंय तर हे सामान्य आहे. पण जर ती व्यक्ती सतत बोलत असेल की मला बोर वाटतंय तर मात्र ते काळजीचं कारण आहे. कारण हा एक विकारही असू शकतो. या विकाराला स्किजॉईड व्यक्तित्व विकार असे म्हणतात. हा आजार नेमका काय आहे त्याची लक्षणे काय याबद्दल आपण जाणून घेऊया. सायकोथेरपिस्ट डॉ. चांदनी तुंगाईत यांनी ओन्लीमाय हेल्थ या संकेतस्थळाला त्याचे उपाय सांगितले आहेत.
स्किजॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डरची कारणे
जी लोक इन्ट्रोवर्ट असतात ती लोकं एकांतात राहतात. त्यांना इतरांमध्ये मिसळणे आवडत नाही. अशी लोकं जेव्हा पुढे आईवडिल होतात त्यांची मुलंही तशीच होतात. जी कधी कोणामध्ये मिक्स होत नाहीत आणि इतरांशी बोलण्यास लाजतात.
काही मुलांचा जन्म अकाली होतं अशी लोकं बरेचदा या आजाराची शिकार होतात.
जन्मल्यानंतर कमी वजन असणं हेही या विकारासाठी कारणीभूत ठरू शकतं.
सध्या कोरोनाकाळात घरातल्याघरात राहण्याने व्यक्ती एकलकोंडी होते. अशावेळी हा आजार होण्याचा धोका जास्त वाढतो.
स्किजॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डरची लक्षणे
सामाजिक उपक्रम टाळणे
कोणाशीही बोलण्यात, मैत्री करण्यात रस न घेणे
मोटीव्हेटेड नसणे. कोणतेही ध्येय नसणे
स्वत:च्या भावना व्यक्त करण्यात अडचण येणे
सतत उदासीन किंवा भावनिकदृष्ट्या थंड असणे
स्किजॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डरची उपाय
अशा व्यक्तींना या आजारातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ टॉक थेरपीचा उपाय करतात ज्यात त्यांना विश्वास दिला जातो आणि आचरण बदलण्यास मदत केली जाते
सामाजिक कौशल्ये सुधारण्यासाठी या रुग्णांना ग्रुप थेरपी द्वारे मदत केली जाते.
कोरोना संक्रमणकाळात असा आजार झाल्यास अशा व्यक्तींना फोन अथवा व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांशी बोलण्यास उद्युक्त करा. घराच्यांशी मनातील नकारात्मक भावनांबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करा.