सावधान! पावसाळ्यात का होतं पोटात इन्फेक्शन?; 'ही' आहेत लक्षणं, 'असा' करा बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 11:00 AM2024-08-03T11:00:26+5:302024-08-03T11:08:54+5:30
पोटातील इन्फेक्शन जरी सामान्य असला तरी त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
मान्सूनच्या आगमनाने उष्णतेपासून नक्कीच दिलासा मिळतो पण त्याचबरोबर अनेक आजारांना सामोरे जावे लागते. तापासोबतच अनेक फ्लू आणि पोटात इन्फेक्शन भीतीही असते. पोटातील इन्फेक्शन जरी सामान्य असला तरी त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण ते खराब पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे होते. ही समस्या कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकते. विशेषत: या ऋतूत मुलांची खूप काळजी घ्यावी.
ही आहेत लक्षणं
पोटातील इन्फेक्शन लक्षणं लगेच दिसून येतात. जसं की उलट्या, ताप, जुलाब, पोटदुखी किंवा मळमळ. याशिवाय रुग्णाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते अशा लोकांमध्ये पोटात इन्फेक्शन जास्त होतो. बरेच लोक याचा संबंध इन्फ्लूएंझाशी जोडतात. पण ते यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. या आजाराचा परिणाम रुग्णाच्या आतड्यांवर जास्त होतो.
पोटाच्या इन्फेक्शनवर काही घरगुती उपाय आहेत जे करून तुम्ही घरीच बरे करू शकता. हा आजार बरा होण्यासाठी सुमारे एक आठवडा लागतो. पावसाळा सुरू झाला की, या आजाराच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढू लागते.
इन्फेक्शन कसं टाळू शकता?
पाणी उकळून प्या
पावसाळ्यात फक्त उकळलेले पाणी प्या. कारण दूषित पाण्यामुळे पोटात इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. या ऋतुमध्ये जंतूंचा प्रसार झपाट्याने होतो. त्यामुळे पाणी पूर्णपणे उकळल्यानंतरच प्यावे. त्यामुळे पाण्यात असलेले जंतू मरतात. उकळल्यानंतर पाणी झाकून ठेवा.
इन्फेक्शन होण्यामागची कारणं
खराब झालेले अन्न खाल्ल्याने पोटात इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
दूषित पाणी प्यायल्याने पोटात इन्फेक्शन होतं.
स्ट्रीट फूड आणि अस्वच्छता हेही एक महत्त्वाचं कारण आहे.
रस्त्यावरील अन्न खाणे देखील शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
जर एखाद्याला हा फ्लू झाला असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला तो होण्याची शक्यताही वाढते.