आतड्या साफ करण्यासाठी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी खास ज्यूस!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 09:38 AM2023-02-14T09:38:04+5:302023-02-14T09:38:44+5:30

Constipation Remedy : मोठ्या आतडीला नेहमीच साफ ठेवणं फार गरजेचं आहे. अशात यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. काही ज्यूसचं सेवन करून तुम्ही मोठी आतडी साफ ठेवू शकता.      

Stomach problem indigestion constipation remedy natural juice cleansing intestine dirt | आतड्या साफ करण्यासाठी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी खास ज्यूस!

आतड्या साफ करण्यासाठी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी खास ज्यूस!

googlenewsNext

Constipation Remedy : शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचन तंत्र व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. पचन तंत्र बिघडलं तर शरीरात वेगवेगळ्या समस्या घर करतात. पचन तंत्रामुळेच शरीराला पोषक तत्व मिळतात. पचन तंत्रासाठी कोलन महत्वाचा अवयव आहे. कोलन म्हणजे मोठी आतडी. मोठ्या आतडीला नेहमीच साफ ठेवणं फार गरजेचं आहे. अशात यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. काही ज्यूसचं सेवन करून तुम्ही मोठी आतडी साफ ठेवू शकता.      

सफरचंदाचा ज्यूस

सफरचंद खाणं आरोग्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढाच याचा ज्यूसही फायदेशीर असतो. सफरचंदाचा ज्यूस सेवन केल्याने पोट साफ राहतं. पोटातील विषारी पदार्थ आणि अनावश्यक गोष्टी विष्ठेच्या माध्यमातून बाहेर पडतात.

भाज्यांचा ज्यूस

भाज्यांचा ज्यूसही आतड्यांसाठी फार फायदेशीर असतो. आतड्या साफ करण्यासाठी पालक, टोमॅटो, गाजर, फूलकोबी, ब्रोकली, भोपळा आणि कारल्याच्या ज्यूसचं सेवन करावं. या भाज्यांच्या ज्यूसने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात आणि आतड्या नेहमीच साफ राहतात. हा ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी प्यावा.

मिठाच्या पाणी आतड्या राहतात साफ

आतड्यांच्या स्वच्छतेबाबत 2010 मध्ये एका स्टडीमध्ये सांगण्यात आलं की, पिण्यात मीठ टाकून सेवन कराल तर आतड्या चांगल्या साफ होतात. दोन चमचे मीठ आणि एक ग्लास कोमट पाणी प्याल तर पोटासाठी आणि आतड्यांसाठी हे फायदेशीर ठरू शकतं.

लिंबू पाणी

लिंबाच्या रसात व्हिटॅमिन सी भरपूर असतं. याने अॅसिडीटी दूर होऊ पचन तंत्रही मजबूत होतं. या ज्यूसबाबत असं सांगितलं जातं की, याने पोटातील नुकसानकारक बॅक्टेरिया मारले जातात आणि आतड्या चांगल्या साफ होतात.

Web Title: Stomach problem indigestion constipation remedy natural juice cleansing intestine dirt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.