आंबट ढेकर येत असल्याने वैतागलात? लगेच करा हे घरगुती उपाय आणि मिळवा आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 11:23 AM2022-02-04T11:23:45+5:302022-02-04T11:24:59+5:30

Stomach Problems : पोटाची ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही हेल्दी फूड खा आणि लाइफस्टाईल हेल्दी ठेवा. काही सोपे उपाय आहेत जे करून तुम्ही आंबट ढेकरपासून सुटका मिळवू शकता.

Stomach Problems : Indigestion khatti dakar can cause stomach problems tips to prevent it | आंबट ढेकर येत असल्याने वैतागलात? लगेच करा हे घरगुती उपाय आणि मिळवा आराम

आंबट ढेकर येत असल्याने वैतागलात? लगेच करा हे घरगुती उपाय आणि मिळवा आराम

googlenewsNext

Stomach Problems : अनेक लोकांना आंबट ढेकर येते, अनेकदा तर खाण्या-पिण्यात काही गडबड झाली तर लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. पोटात हवा भरली गेल्याने किंवा अपचनामुळे अशी स्थिती बनते. त्याशिवाय अनेकदा घाईघाईने खाल्ल्याने किंवा कोल्ड ड्रिंक्स आणि दारूचं अधिक सेवन केल्याने आंबट ढेकर येते. तळलेले-भाजलेले पदार्थ खाल्ल्याने किंवा रात्री उशीरा जेवल्याने सुद्धा ही समस्या होते.

पोटाची ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही हेल्दी फूड खा आणि लाइफस्टाईल हेल्दी ठेवा. काही सोपे उपाय आहेत जे करून तुम्ही आंबट ढेकरपासून सुटका मिळवू शकता.

- वेलची खाऊन तुम्ही आंबट ढेकर येण्याची समस्या दूर करू शकता. जर तुम्हाला वेलची खाणं आवडत नसेल तर वेलची टाकून काळा हा घेऊ शकता. त्यात थोडा लिंबाचा रसही घालू शकता. याने लवकर आणि चांगला आराम मिळेल.

- काळ्या मिठाचं सेवन तर तसं नेहमीच केलं पाहिजे. कारण याचे अनेक फायदे आहेत. त्यासोबत अनेक पदार्थांची टेस्टही काळ्याने मिठाने अधिक चांगली होते. काळ्या मिठाने पचनक्रिया मजबूत होते आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात. आंबट ढेकर येत असेल तर एक ग्लास पाण्यात अर्धा छोटा चमचा काळं मीठ टाका आणि हे पाणी प्या.

- जड जेवण केल्यावर अनेकदा लोक अर्धा चमचा लिंबाचा रस पितात. याने अन्न पचनास मदत मिळते. डॉक्टर्सही पोटासंबंधी समस्येत लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. आंबट ढेकर दूर करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाकून सेवन करा.

- लिंबू पाण्यात पुदीना टाकू शकता. त्याशिवाय केवळ पुदीना पाणी पिऊनही तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण पुदीना थंड असतो आणि याने पोटासंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते.

- तरीही तुम्हाला आंबट ढेकर येत असेल तर तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण यामागे दुसरा कोणता आजारही असू शकतो. त्यामुळे टेस्ट करून योग्य ते उपचार घ्या.

(टिप - वरील लेखातील सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित आहेत. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. तुम्हाला काही समस्या असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. किंवा यातील सल्ले फॉलो करण्याआधीही तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.)
 

Web Title: Stomach Problems : Indigestion khatti dakar can cause stomach problems tips to prevent it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.