1 महिना चहा आणि कॉफीचं सेवन बंद करून बघा, शरीराला मिळतील हे 5 मोठे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 04:29 PM2024-04-01T16:29:19+5:302024-04-01T16:29:48+5:30

Caffeine side effects :जर तुम्ही 1 महिना चहा-कॉफीचं सेवन बंद कराल तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. असेच 5 मोठे फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Stop drinking tea and coffee for 1 month, the body will get these 5 great benefits! | 1 महिना चहा आणि कॉफीचं सेवन बंद करून बघा, शरीराला मिळतील हे 5 मोठे फायदे!

1 महिना चहा आणि कॉफीचं सेवन बंद करून बघा, शरीराला मिळतील हे 5 मोठे फायदे!

Caffeine side effects : जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफीने होते. चहा किंवा कॉफी प्यायले नाही तर अनेकांचा दिवसच पूर्ण होत नाही. इतकंच काय तर बरेच लोक दिवसभर अनेक कप चहा पितात. पण जास्त चहा-कॉफीच्या सेवनाने आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्या होतात. अशात जर तुम्ही 1 महिना चहा-कॉफीचं सेवन बंद कराल तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. असेच 5 मोठे फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चहा आणि कॉफी सोडण्याचे फायदे

एंग्झायटी होणार नाही

जर तुम्ही चहा आणि कॉफी 1 महिन्यासाठी पिणं बंद कराल तर तुम्हाला घाबरल्यासारखं आणि डिप्रेशन अशा समस्या होणार नाहीत. या पेयांच्या जास्त सेवनामुळे हृदयचे ठोके सामान्यपेक्षा अधिक गतीने चालतात. यामुळे एंग्झायटी अठॅकचा धोका वाढतो. जे लोक आधीच मानसिक रोगांने पीडित आहेत त्यांनी खासकरून चहा-कॉफी पिणं टाळलं पाहिजे.

चांगली झोप येईल

चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन भरपूर असतं. तुम्ही जर याचं जास्त सेवन केलं तर तुमची रात्रीची झोप खराब होऊ शकते. अशात रात्री चहा कॉफीचं सेवन करू नका. चहा नेहमी झोपण्याच्या 6 तास आधी घ्यावा. 1 महिना याचं सेवन बंद केलं तर तुमच्या झोपेच्या क्वालिटीमध्ये सुधारणा होईल.

पोषक तत्व अवशोषित होतील

जर तुम्ही चहा किंवा कॉफी पिणारे नसाल तर तुमचं शरीर कॉफी पिणाऱ्यांच्या तुलनेत काही पोषक तत्व चांगल्या पद्धतीने अवशोषित करू शकतं. जसे की, कॅल्शिअम, लोह आणि व्हिटॅमिन बी.

दात हेल्दी राहतात

फार जास्त चहा आणि कॉफी पिणाऱ्यांच्या दातांवरही फार वाईट प्रभाव पडतो. यामुळे दातांवर डाग पडतात. अशात 1 महिना तुम्ही चहा कॉफीचं सेवन बंद केलं तर तुमचे दात हेल्दी आणि चमकदार दिसतील.

ब्लड प्रेशर कंट्रोल होईल

कॅफीनचं सेवन न करणं तुमच्या ब्लड प्रेशरसाठी फार फायदेशीर होईल. दिवसातून 3 ते 5 कप कॅफीन तुमच्यात हृदयरोगाचा धोका वाढवू शकतं.

Web Title: Stop drinking tea and coffee for 1 month, the body will get these 5 great benefits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.