Kidney खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतात या गोष्टी, आजही खाणं करा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 12:53 PM2023-11-24T12:53:59+5:302023-11-24T12:54:33+5:30

Bad Foods For Kidney Health: असे काही पदार्थ असतात जे किडन्यांना लवकर म्हातारं करतात. चला जाणून घेऊ किडनी चांगल्या ठेवण्यासाठी काय खाणं टाळलं पाहिजे.

Stop eating these things that cause kidney damage | Kidney खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतात या गोष्टी, आजही खाणं करा बंद

Kidney खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतात या गोष्टी, आजही खाणं करा बंद

Bad Foods For Kidney Health:  किडनी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. पण आपल्याचा काही चुकीच्या सवयींमुळे किडनीचं काम मंदावतं. ज्यामुळे अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. अशात आपल्या आहारावर तुम्ही लक्ष देण्याची फार गरज असते. जर तुमच्याच चुकांमुळे दोन्ही किडनी खराब झाल्यावर जीवही जाऊ शकतो. त्यामुळे काही पदार्थ आहारातून लगेच दूर केले पाहिजे. असे काही पदार्थ असतात जे किडन्यांना लवकर म्हातारं करतात. चला जाणून घेऊ किडनी चांगल्या ठेवण्यासाठी काय खाणं टाळलं पाहिजे.

सोडा कमी प्या

सोडा किडनीला नुकसान पोहोचवण्याचं काम करतो आणि याने किडनी कमजोर होतात. त्यामुळे सोड्याचं सेवन करणं टाळलं पाहिजे. याचं जर तुम्ही नियमित आणि जास्त सेवन करत असाल तर मग तुमच्या किडनी लवकर खराब होऊन तुमच्या समस्या वाढू शकतात.

एवोकाडो फळ खाऊ नका

एवोकाडो फळाचे शरीराला अनेक फायदे मिळतात. पण यापासून काही लोकांना नुकसानही होऊ शकतं. ज्यांना किडनीची काही समस्या आहे त्यांनी हे फळ अजिबात खाऊ नये. कारण यात पोटॅशिअम खूप जास्त असतं. जे किडनीला नुकसान पोहोचवू शकतं.

तळलेले पदार्थ टाळा

तळलेले पदार्थ आपल्या शरीरासाठी फार नुकसानकारक ठरतात. आजकाल जास्तीत जास्त लोक बाहेरचे तळलेले पदार्थ खूप खातात. पण तळलेल्या पदार्थांमुळे आरोग्य खूप जास्त बिघडू शकतं. रोज तळलेले पदार्थ खाल्ले तर किडनी खराब होऊ शकते.

पिझ्झा खाणं टाळा

पिझ्झा खाणं सगळ्यांनाच आवडतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पिझ्झा खाणं आरोग्यासाठी फार नुकसानकारक आहे. पिझ्झा खाल्ल्याने तुमच्या किडनी खराब होऊ शकतात.

Web Title: Stop eating these things that cause kidney damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.