रस्त्यावर मिळणार्या खाद्यपदार्थांचा आरोग्यावर होणारा हानिकारक परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 12:04 PM2019-04-18T12:04:31+5:302019-04-18T12:05:50+5:30
रस्त्यावर मिळणार्या खाद्य पदार्थांचे सेवन, आरोग्य आणि अन्नाद्वारे पसरणार्या रोगांचा जवळचा संबंध आहे.
रस्त्यावर मिळणार्या खाद्य पदार्थांचे सेवन, आरोग्य आणि अन्नाद्वारे पसरणार्या रोगांचा जवळचा संबंध आहे. तुम्हाला हे माहीत आहे का की, तळलेले खाद्य पदार्थ त्यातील कॅलरीच्या उच्च मात्रेमुळे आणि हृदयासाठी ते उचित नसल्यामुळे आरोग्यासाठी चांगले नसतात. रस्त्यावर मिळणार्या खाद्य पदार्थांचे सेवन आणि लोकांना होणारे रोग हे भारतातील सार्वजनिक आरोग्याबाबत चिंतेचे विषय झाले आहेत.
आरोग्यविषयक एजन्सीजनी वेळोवेळी खाद्य पदार्थातील सूक्ष्म जीवांच्या प्रमाणाची तपासणी करून ते मान्य मर्यादेत आहेत की नाही हे पाहणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात, उपभोक्ते, त्यांच्या आहाराच्या सवयी, वर्तन आणि जागरूकता याबाबत अगदी कमी लक्ष दिले जाते. लोकांच्या भौगोलिक आणि सामाजिक उद्गमावरून अन्नाबाबतचा शारीरिक स्वीकार आणि त्याबद्दलची प्रतिक्रिया नक्की होत असते.
नानावटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमधील, न्यूट्रिशनिस्ट उषाकिरण सिसोदीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखादी व्यक्ती बाहेरचे अन्न खात असेल, तर त्याचा शरीरावर हानिकारक परिणाम होण्याचे टाळण्यासाठी काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. रस्त्यावरील खाद्य पदार्थांशी निगडीत अस्वच्छता, असुरक्षित पाण्याचा वापर, रस्त्यावरील प्रदूषणाचा परिणाम ह्या काही अशा गोष्टी आहेत, ज्या तुमच्या खाण्याच्या प्लेटमध्ये बॅक्टेरियांची संख्या वाढवत असतात.
तुम्हा सर्वांना हे माहीतच आहे की, खाद्य पदार्थ अधिक काळ टिकावेत आणि त्यातील स्वाद वाढावा यासाठी रस्त्यावर मिळणार्या खाद्य पदार्थांत खूप जास्त मीठ घातलेले असते. उदा. चिकन लॉलीपॉप, फ्रेंच फ्राइज, फ्रँकी). ज्या व्यक्तिला शरीरात पाणी साठण्याचा त्रास असतो तसेच उच्च रक्त दबाची समस्या असते त्याच्यासाठी हे पदार्थ हानिकारक ठरतात.
भराभर तळण्यासाठी, एकावेळी जास्त प्रमाणात पदार्थ बनवण्यासाठी बर्याचदा रस्त्यावर मिळणारे हे पदार्थ खूप मोठ्या आचेवर तळले जातात. तेलाचा पुन्हा पुन्हा तळण्यासाठी केलेल्या वापरामुळे ते त्याचा स्मोक-पॉइंट पार करते. ज्याच्यामुळे मुक्त रॅडीकल्स मोठ्या संख्येत सुटी होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांसाठी ती कॅन्सर निर्माण करणारी ठरतात. तेलाचा पुन्हा पुन्हा अनेकवेळा वापर केल्याने तेलात ट्रान्स-फॅट वाढते.
रस्त्यावरील खाद्यपदार्थांत मैदा आणि साखर हे मुख्य घटक असतात. त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असल्याने, त्यांचे अधिक प्रमाणातील सेवन अनियंत्रित मधुमेह, स्थूलता, कॅन्सर व इतर रोगांचे कारण बनू शकते.
अन्नाची अयोग्य हाताळणी आणि त्याचा निकृष्ट दर्जा यामुळे हीपेटायटीस A व्हायरस पसरू शकतो. दूषित पेय जल, नीट न शिजवलेला शेलफिश हे या व्हायरसचे सामान्य स्रोत आहेत. त्याचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी करावी लागते कारण त्याची लक्षणे इतर रोगांसारखीच असतात. A, B, C, D आणि E या 5 ज्ञात हीपेटायटिस व्हायरसपैकी हा एक आहे.
जे लोक वारंवार घराबाहेर खातात त्या सर्वांसाठी ही असुरक्षितता असते. सर्व फास्ट फुडमध्ये सोडीयम, सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण उच्च असते. दीर्घ काळ बाहेरचे अन्न खात राहिल्यास उच्च रक्तदाब, हृदय विकार आणि स्थूलता यासारख्या आरोग्य समस्या होण्याची शक्यता असते. रस्त्यावरील खाद्य पदार्थ खाल्ल्याने तुमचे LDL (खराब कोलेस्टेरॉल) वाढण्याची आणि HDL (चांगले कोलेस्टेरॉल) कमी होण्याची शक्यता असते.
जाणीवपूर्वक खा आणि समंजसपणे निवड करा!