एका मिनिटात तणाव करा छुमंतर, फक्त या टीप्स करा फॉलो...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 02:14 PM2021-07-05T14:14:24+5:302021-07-05T14:15:02+5:30
अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे आपल्याला लगेच ताण येतो. आयुष्यातील दु:खद प्रसंग, धावती जीवनशैली, स्पर्धात्मक युग यामध्ये आपलं जीवन हे सतत तणावपुर्ण असतं. पण या तणावाशी सामना करायचा कसा?
अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे आपल्याला लगेच ताण येतो. आयुष्यातील दु:खद प्रसंग, धावती जीवनशैली, स्पर्धात्मक युग यामध्ये आपलं जीवन हे सतत तणावपुर्ण असतं. पण या तणावाशी सामना करायचा कसा? यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. कॅब्रियन कॉलेजच्या संशोधनानुसार ताण हलका करण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात, जे एका मिनिटात तुमचा तणाव हलका करतील.
१ मिनिटात तणाव कसा दूर कराल?
या उपायांनी तुम्ही १ मिनिटात तुमचा तणाव हलका करू शकता पण यासाठी तुम्हाला या उपायांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण विश्वास केल्याने याचा प्रभाव वाढतो.
ऑक्सिजनचा पुरवठा
तणाव कमी करण्यासाठी तुम्ही दिर्घ श्वास घ्यायला हवा. जेव्हा शरीरात ऑक्सिजन लेवल वाढते तेव्हा आपल्या डोक्यावरील ताण हलका होतो.
स्ट्रेस टॉय
तुम्ही तणाव हलका करण्यासाठी स्ट्रेस टॉयचा वापरही करू शकता. स्ट्रेस टॉयच्या मदतीने तुमचे लक्ष त्यावेळेच्या तणावपूर्ण परिस्थीतीकडून विचलित होते आणि तुम्हाला चांगले वाटू लागते.
संगीत
संगीत ही अशी रेमडी आहे जी भलेभले टेन्शन दूर पळवते. म्युझिकमुळे तुमचे डोके शांत होते. तुमचा मुड बदलून जातो. तणावपूर्ण परिस्थीतीत मनाला उभारी देणारे म्युझिक ऐकावे.
संवाद साधा
जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा आपल्या आवडीच्या व्यक्तिसोबत गप्पा मारा. तुमच्या मनातील दु:ख शेअर करा. बघा कसा ताण चटकन हलका होतो.
पेशन्स ठेवा
कोणत्याही समस्येचे उत्तर वेळेनुसार मिळुन जाते. त्यामुळे आपल्या आयुष्यात सबुरी म्हणजेच पेशन्स आणि सकारात्मकता ठेवली पाहिजे. जेव्हा जास्त ताण येतो तेव्हा सकारात्मक गोष्टींचा विचार करण्याचा प्रयत्न करा.