तणावात असताना लोक 'या' शब्दांचा अधिक करतात वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 01:32 PM2018-10-22T13:32:03+5:302018-10-22T13:32:20+5:30
तणावाची ही समस्या ही अलिकडे अनेकांना भेडसावत आहे. यातून बाहेर येण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या ट्रिटमेंट घेतात.
तणावाची ही समस्या ही अलिकडे अनेकांना भेडसावत आहे. यातून बाहेर येण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या ट्रिटमेंट घेतात. पण याची लक्षणे अनेकांना आधी ओळखता येत नाहीत आणि ही समस्या अधिक वाढत जाते.
अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार काही असे शब्द जे आपण पुन्हा पुन्हा वापरतो, ते तुम्ही तणावात असल्याचं दाखवतात. स्पीच एक्सपर्ट्स ग्रुपनुसार, जेव्हा कुणी तणावात असतं तेव्हा त्यांच्या तोंडून 'रिअली', 'सो' आणि 'व्हेरी' सारखे शब्द अधिक निघतात. या अभ्यासातून असेही समोर आहे की, तणावात लोक बोलतातही कमी.
प्रॉसीडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित या शोधात १४३ लोकांच्या बोलण्याचं परिक्षण करण्यात आलं. सर्वांना एक व्हॉईस रेकॉर्डर देण्यात आलं होतं. जे थोड्या थोड्या वेळाने ऑन होत होतं.
हे रेकॉर्डर त्यांनी दोन दिवसांपर्यंत लावून ठेवलं होतं. मानसोपचारतज्ज्ञ मथायस यांनी रेकॉर्डिंग ऐकून ते लिहून काढलं आणि त्याचा अभ्यास केला. त्यांनी सांगितले की, 'त्यांच्या दृष्टीने ते जे बोलत होते त्यांचा काही अर्थ नव्हता. पण हे स्पष्ट होत होतं की, त्यांच्या आत काय सुरु आहे'.
त्यानंतर त्यांनी जीनोमिसिस्टसच्या टिमसोबत त्यांची स्ट्रेस लेव्हल चेक केली. तेव्हा हे आढळून आलं की, जे लोक तणावात होते त्यांनी अॅडव्हर्ब्सचा म्हणजेच क्रियापदांचा अधिक वापर केला होतो.
सोबतच अशा लोकांनी 'त्यांच्या' आणि 'ते' या शब्दांचाही अधिक वापर केला. याने हेही माहिती झालं की, जे लोक तणावात असतात ते आजूबाजूच्या लोकांपेक्षा स्वत:वर अधिक फोकस करु शकतात.