टॉयलेटमधील हॅंड ड्रायरचा वापर आरोग्यासाठी धोकादायक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 10:35 AM2018-10-31T10:35:46+5:302018-10-31T10:36:30+5:30
अनेकदा पब्लिक टॉयलेट्सचा वापर केल्यावर तुम्ही तिथे असलेल्या हॅंड ड्रायरने हात कोरडे केले असतील. पण आता तुम्ही या हॅंड ड्रायरचा वापर करणे लगेच बंद केले पाहिजे.
(Image Credit : AOL.com)
अनेकदा पब्लिक टॉयलेट्सचा वापर केल्यावर तुम्ही तिथे असलेल्या हॅंड ड्रायरने हात कोरडे केले असतील. पण आता तुम्ही या हॅंड ड्रायरचा वापर करणे लगेच बंद केले पाहिजे. तुम्ही म्हणाल आता याची काय समस्या आहे? तर नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून हॅंड ड्रायरबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. टॉयलेटमध्ये असणाऱ्या हॅंड ड्रायरने तुमचे हात कोरडे होतात, पण सोबतच अस्वच्छही होतात.
अप्लाइड अॅंन्ड इन्वायरनमेंटल मायक्रोबायोलॉजी नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, टॉयलेटमध्ये ठेवण्यात आलेल्या हॅंड ड्रायरसमोर केवळ ३० सेकंदासाठी ठेवण्यात आलेल्या प्लेट्सवर १८ ते ६० बॅक्टेरिया आढळले. या अभ्यासाच्या लेखकांनी सांगितले की, या अभ्यासातून हे समोर आलंय की, पॅथोजन आणि स्पोर्ससारखे बॅक्टेरिया हॅंड ड्रायरसमोर हात धरल्यास तुमच्या हातावर येतात.
टॉयलेटच्या दूषित हवेला पसरवतो ड्रायर
अभ्यासाच्या लेखकांना आढळलं की, ड्रायरच्या तोंडाशी बॅक्टेरिया कमी होते. पण या बॅक्टेरिया आश्रय घेत आहे हे सिद्ध करण्यासाठी आणखी काही पुराव्यांची गरज पडणार आहे. टॉयलेटची दूषित हवा पसरवण्याबाबतही असेच म्हणावे लागेल. असे यासाठी म्हणावे लागेल कारण टॉयलेटच्या हवेत शौचातील तत्व आणि लघवीचे छोटे छोटे थेंबही असू शकतात.
रोगप्रतिकारक शक्ती होते कमी
या अभ्यासाचे लेखक पीटर सेटलो म्हणाले की, 'टॉयलेटची हवा जितकी जास्त पसरेल तितके बॅक्टेरिया तुमच्या शरीरावर आणि हातावर चिकटतील. अशात ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर आहे. ते लगेच आजारी पडू शकतात. त्यामुळे बॅक्टेरिया टाळण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. मी हॅंड ड्रायरचा वापर बंद केला आहे'.
हॅंड ड्रायरला फिल्टर असणं गरजेचं
असे असले तरी अभ्यासात हेही सांगण्यात आले आहे की, काही हॅंड ड्रायर्स ज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर लावलेले असतात. याप्रकारचे हॅंड ड्रायर्स बॅक्टेरिया काही प्रमाणात रोखू शकतात.