जेवणामुळे नव्हे, तर 'या' गोष्टींमुळे वाढतंय तुमचं वजन?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 11:58 AM2018-02-20T11:58:14+5:302018-02-21T15:25:37+5:30
वजन वाढण्यामागील नेमकं कारण काय? याबद्दलही पटकन समजत नाही.
मुंबई- वाढत्या वजनाची चिंता सगळ्यांनाच सतावत असते. योग्य व्यायाम, खाण्याची योग्य सवय अशा सगळ्या गोष्टी पाळल्या तरी वजन नियंत्रणात येत नसल्याची तक्रार बरेच जण करताना दिसतात. वजन वाढण्यामागील नेमकं कारण काय? याबद्दलही पटकन समजत नाही. पण, अमेरिकेत झालेल्या एका रिसर्चनुसार जेवण पॅक करण्यासाठी वापरला जाणारा कागद, नॉन स्टिक पॅनमध्ये लावलं गेलेलं कोटिंग आणि कपड्यांमध्ये वापरलं जाणारं केमिकल तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्मबरोबर हस्तक्षेप करत तुमच्या शरीरातील वजन वाढविण्याचं काम करतं. या गोष्टींमध्ये जे केमिकल वापरलं जातं त्याला परफ्युरॉलकिल सब्स्टेंस PFASs म्हणतात. यामुळे कॅन्सर, हार्मोनमध्ये बदल, इम्यून सिस्टममध्ये गडबड, हाय कोलस्ट्रॉल आणि वजन वाढण्याची शक्यता असते.
हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या न्यूट्रिशन विभागाचे सहाय्यक प्रोफेसर आणि रिसर्चमधील वरीष्ठ ऑथर सन यांच्या माहितीनुसार, PFASs मुळे मानवी शरीरातील वजन नियंत्रण करण्याच्या क्षमतेवर हस्तक्षेप होतो ज्यामुळे वजन वाढतं, असा रिसर्चमधून खुलासा झाल्याचं त्यांनी म्हंटलं. रिसर्चच्या माहितीनुसार, PFASs चा संबंध शरीराच्या मेटाबॉलिक रेटशी असतो. ज्यांच्या शरीरात PFASs जास्त प्रमाणात असतं त्यांचं वजन घटल्यानंतरही मेटाबॉलिज्म खूप हळू काम करतं.
2000 साली वजन कमी करण्यावरून वैद्यकीय तपास झाला होता. यामध्ये 621 अतीजास्त वजनाच्या व्यक्तींच्या माहितीचा अभ्यास केला गेला. या अभ्यासात दोन वर्षात वजन घटविण्यासाठी चार हार्ट हेल्थी डाएटच्या परिणामांचा सहभाग होता. या अभ्यासात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या रक्ताक PFASs वेगवेगळ्या प्रमाणात आढळून आलं.