दारूचं व्यसन सोडवायचं आहे? डाएटमध्ये या भाजीचा करा समावेश, रिसर्चमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 03:17 PM2022-08-30T15:17:28+5:302022-08-30T15:17:56+5:30
Alcohol Habit : वेळ न घालवता यातून मुक्त होणं समजदारी आहे. दारूचं व्यसन सोडण्याबाबत अनेक रिसर्च करण्यात आले आहेत. ज्यातून समोर आलं की, नैसर्गिक पद्धतीनेही तुम्ही दारूचं व्यसन सोडवू शकता.
Alcohol Habit : दारू पिणं आणि दारूची सवय लागणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही किंवा तुमच्या संपर्कातील कुणी दारूच्या व्यसनाने ग्रस्त असेल तर ही गंभीर समस्या आहे. जर तुम्हीही कधी कधी फार जास्त प्रमाणात मद्यसेवन करत असाल तर हे तुमच्यासाठी विष ठरू शकत नाही. पण तुम्ही जर आठवड्यातून 12 ते 15 किंवा कॅनपेक्षा जास्त मद्यसेवन करत असाल तर तुम्हाला दारूचं व्यसन लागलं आहे. वेळ न घालवता यातून मुक्त होणं समजदारी आहे. दारूचं व्यसन सोडण्याबाबत अनेक रिसर्च करण्यात आले आहेत. ज्यातून समोर आलं की, नैसर्गिक पद्धतीनेही तुम्ही दारूचं व्यसन सोडवू शकता.
एका रिसर्चनुसार, भारत दारू सेवनाच्या बाबतीत फार पुढे आहे. भारत चीननंतर स्पिरिट्सचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारतात 663 मिलियन लीटरपेक्षा अधिक दारूचं सेवन केलं जातं.
दारूचं सेवन का धोकादायक आहे?
जास्त मद्यसेवन केल्याने लिव्हर डॅमेज होण्याचा धोका असतो. सोबतच गॅस्ट्रोइंटेस्टाइनल मार्गातून ब्लीडिंग, मेंदूच्या कोशिकांचा नुकसान, कॅन्सर, वेडसरपणा, डिप्रेशन, हाय ब्लड प्रेशर, अग्नाशयात सूज, नर्व डॅमेज, किडनी समस्या होण्याचा धोका जास्त असतो.
का लागतं दारूचं व्यसन
दारूचं व्यसन लागणं एक आजार आहे ज्याबाबत अजूनही पूर्णपणे माहिती मिळू शकलेली नाही. अल्कोहोल यूज डिसॉर्डर तेव्हा विकसित होतो जेव्हा तुम्ही खूप जास्त दारू प्यायल्याने मेंदूत रासायनिक परिवर्तन होतं. जेव्हा तुम्ही दारू पिता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये आनंद देणाऱ्या भावना वाढणारे हार्मोन्स उत्तेजित होतात. यामुळे तुम्ही अधिक जास्त दारू पिता. भलेही याने नुकसान होतं. दारूचं व्यसन हळूहळू विकसित होतं. याला जेनेटिकही मानलं जातं.
या भाजीच्या सेवनाने दारूचं व्यसन सुटतं
जामा मनोचिकित्सामध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, मॅजिक मशरूम ज्याला सायकेडेलिक मशरूम म्हणून ओळखलं जातं. हे खाल्ल्याने दारूचं व्यसन नियंत्रित केलं जाऊ शकतं.
मशरूममध्य सायलोसायबिन नावाचं एक तत्व असतं. जे मानसिक विकारांना दूर करण्यासाठी फायदेशीर असतं. अशात एका रिसर्च दरम्यान 93 दारूच्या व्यसनानेग्रस्त लोकांना सायलोसायबिन किंवा एक डमी औषध असलेलं कॅप्सूल देण्यात आलं. काही महिन्यांनी आढळून आलं की, psilocybin घेणाऱ्या जवळपास अर्ध्या लोकांनी पूर्णपणे दारू पिणं बंद केलं.
काय सांगतो रिसर्च?
रिसर्चमधून हे समोर आलं की, मशरूममधील तत्व सायलोसायबिनने लोकांना दारूचं व्यसन सोडवण्यास मदत केली. यावर आणखी शोध करण्याची गरज आहे. अनेक लोक ज्यांनी फेक औषध घेतलं त्यांनीही दारू पिणं कमी केलं.
मशरूमच्या अनेक प्रजातींमध्ये आढळणारं सायलोसायबिन तत्व अनेक तास मतिभ्रम निर्माण करू शकतं. वैज्ञानिक याचा शोध घेत आहेत की, याने डिप्रेशन कमी केलं जाऊ शकतं का? किंवा धुम्रपानाची सवय सोडवली जाऊ शकते का?