CoronaVirus News: ...तर तुम्हालाही कोरोनाचा कमी धोका; ४० हजार व्यक्तींवरील संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 10:41 PM2021-07-10T22:41:03+5:302021-07-10T22:43:18+5:30
CoronaVirus News: अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांचा ४० हजार ब्रिटिश नागरिकांवर अभ्यास
वॉशिंग्टन: कॉफी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कॉफी प्यायल्यानं कोरोनाचा धोका कमी होत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी ४० हजार ब्रिटिश नागरिकांचा अभ्यास करून याबद्दलचा निष्कर्ष मांडला आहे. रोज एक कॉफी प्यायल्यास कोरोनापासून सुरक्षा मिळते. भाज्यांमुळेदेखील असाच फायदा होतो, अशी माहिती संशोधनातून पुढे आली आहे.
कॉफीमध्ये आरोग्याला फायदेशीर केमिकल असतात. त्यांच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, असं संशोधन सांगतं. कॉफी प्यायल्यानं संसर्गातून होणाऱ्या आजारांचा धोका १० टक्क्यांनी कमी होतो. भाज्या खाल्ल्यानंदेखील आजारांचा धोका घटतो, अशी महत्त्वपूर्ण माहिती संशोधनातून समोर आली आहे.
विशेष म्हणजे या अभ्यासात फळं फायदेशीर नसल्याचं दिसून आलं आहे. चहामुळेदेखील कोणतेही आरोग्यपूर्ण फायदे होत नसल्याचं संशोधन सांगतं. सॉसेज आणि बॅकॉन यासारख्या प्रक्रिया करण्यात आलेलं मांसामुळे आजार आणखी बळावू शकतो, अशीही माहिती संशोधनातून पुढे आली आहे. न्यूट्रिएंट्स नावाच्या नियतकालिकात ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.