जन्माआधीच बाळाला 'या' कारणाने होऊ शकतो अस्थमा, जाणून घ्या कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 11:00 AM2019-12-05T11:00:06+5:302019-12-05T11:06:38+5:30
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, कोल्ड व्हायरस गर्भवती महिलांमध्ये प्लेसेंटाला संक्रमित करू शकतात.
(Image Credit : motherandbaby.co.uk)
सर्दी-पडसा होण्याला सगळेच फार सामान्य समजतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. इतकंच काय तर सर्दी-पळशाला आपल्यापैकी अनेकजण आजारच मानत नाहीत. मात्र, यादरम्यान श्वास आणि झोपेसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एका नॉर्मल व्यक्तीला सर्दी जेवढी हैराण करू शकते, त्यापेक्षा कितीतरी त्रास एका गर्भवती स्त्री ला होऊ शकतो. इतकेच नाही तर सर्दीमुळे-पडशामुळे गर्भवती महिलेल्या पोटात वाढत असलेल्या बाळावरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
(Image Credit ; health.com)
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, कोल्ड व्हायरस गर्भवती महिलांमध्ये प्लेसेंटाला संक्रमित करू शकतात. प्लेसेंटा एक असा अवयव आहे जो महिलांच्या गर्भावस्थेदरम्यान यूट्रसमध्ये डेव्हलप होतो. प्लेसेंटाच गर्भातील भ्रूणाला ऑक्सिजन आणि आवश्यक न्यूट्रिशन पोहोचवतो. तसेच यानेच भ्रूणाचं रक्त प्युरिफाय केलं जातं आणि वेस्ट मटेरिअल भ्रूणापर्यंत पोहोचू देत नाही. सोबतच भ्रूण ज्या गर्भनाळेसोबत जुळलेलं असतं, ती सुद्धा प्लेसेंटापासूनच डेव्हलप होते.
(Image Credit : medicalxpress.com)
हा रिसर्च नुकताच PLOS ONE जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या रिसर्चचं नेतृत्व जियोवानी पिडिमोटे यांनी केलंय. पिडिमोटे बालरोग तज्ज्ञ आणि तुलाने युनिव्हर्सिटीमध्ये पीडियाट्रिक्सचे प्राध्यापक आहेत. ते म्हणाले की, रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, गर्भावस्थेदरम्यान जर एखाद्या महिलेला सर्दी-पडसा होत असेल थंडी आणि शरीरात वाढणारे व्हायरस भ्रूणापर्यंत पोहोचू शकतात. हे कोल्ड व्हायरस भ्रूणाच्या श्वसननलिकेत समस्या निर्माण करू शकते.
इतकेच नाही तर अनेक स्थितीत कोल्ड व्हायरस गर्भात वाढत असलेल्या भ्रूणाला इतकं नुकसान पोहोचवू शकतात की, जन्मानंतर बाळाला अस्थमाचा आजार होऊ शकतो. अभ्यासकांचं मत आहे की, गर्भवती महिलेच्या गर्भात प्लेसेंटा भ्रूणाची काळजी घेताना एका गेटकीपर म्हणजेच चौकीदाराप्रमाणे काम करतो. पण झिका किंवा काही स्थितींमध्ये कोल्ड व्हायरस भ्रूणापर्यंत पोहोचतात. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे गर्भावस्थेदरम्यान महिलांनी सर्दीपासून वाचण्यासाठी अधिक काळजी घेतली पाहिजे.