जास्त मीठ खाल्ल्याने 28 टक्के वाढतो मृत्यूचा धोका, ही 7 लक्षणं दिसली तर वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 01:15 PM2022-07-14T13:15:27+5:302022-07-14T13:15:40+5:30
if you eat too much salt: रिसर्चमध्ये सहभागी लोकांना प्रश्नावलीच्या माध्यमातून विचारण्यात आलं की, काय त्यांनी जेवणात वरून मीठ घेतलं का? आणि घेतलं तर किती वेळा घेतलं?
if you eat too much salt: यूरोपिय हार्ट जर्नलमध्ये 11 जुलैला प्रकाशित रिसर्चनुसार यूके बायोबॅंक अभ्यासात 501,379 सहभागी लोकांचा डेटा बघण्यात आला, हे सगळे लोक 2006 आणि 2010 मध्ये रिसर्चमध्ये सहभागी झाले होते. रिसर्चमध्ये सहभागी लोकांना प्रश्नावलीच्या माध्यमातून विचारण्यात आलं की, काय त्यांनी जेवणात वरून मीठ घेतलं का? आणि घेतलं तर किती वेळा घेतलं? अशात असं आढळून आलं की, जे लोक जेवणात वरून मीठ घेत होते, त्यांच्यात वेळेआधी मृत्यूचा धोका 28 टक्के वाढला होता.
महिला-पुरूषांमध्ये दिसतात वेगवेगळे प्रभाव
महिला आणि पुरूषांमध्ये जेवणात वरून मीठ घेण्याचा धोका वेगवेगळा दिसून येतो. रिसर्चमधून समोर आलं की, 50 वयोगटातील लोक ज्यांनी खाद्य पदार्थांमध्ये मीठ घेतलं होतं, त्यांचं जीवन जवळपास 2.28 वर्षात संपलं होतं. हेच महिलांसाठी 1.5 वर्ष होतं.
मिठाच्या जास्त प्रमाणाने वाढते समस्या
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO नुसार, दिवसातून 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाल्लं तर हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. हे धोके टाळण्यासाठी एका वयस्क व्यक्तीने दिवसातून 5 ग्रॅमपेक्षा कमी मिठाचं सेवन करावं.
मिठाचं प्रमाण वाढल्याचे संकेत
- पोट फुगणे
- पोटात सूज
- हाय ब्लड प्रेशर
- पुन्हा पुन्हा तहान लागणे आणि लघवी लागणे
- झोपेची समस्या
- कमजोरी
धोका कसा कमी करायचा?
तज्ज्ञ नेहमीच मिठाचं प्रमाण कमी असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. पॅकेटमध्ये बंद असलेले पदार्थ विकत घेताना त्यावरील माहिती वाचा. कारण पॅकेड फूडमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. तसेच मिठाचं शरीरातील प्रमाण कमी करण्यासाठी गाजर, ओवा, फळं किंवा हिरव्या भाज्यांचं सेवन करा.