'या' कारणामुळे कमजोर झालं पुरूषांचं हृदय, Heart Attack बाबत रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 01:53 PM2023-09-22T13:53:08+5:302023-09-22T13:54:09+5:30

Heart Attack : एका रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. रिसर्चमध्ये पुरूषांना हार्ट अटॅकचा धोका जास्त का असतो याचं कारण सांगितलं.

Study revealed reason of heart attack and cardiovascular disease risk for men | 'या' कारणामुळे कमजोर झालं पुरूषांचं हृदय, Heart Attack बाबत रिसर्चमधून खुलासा

'या' कारणामुळे कमजोर झालं पुरूषांचं हृदय, Heart Attack बाबत रिसर्चमधून खुलासा

googlenewsNext

Heart Attack : आजकाल हार्ट अटॅक अनेक भयावह केसेस बघायला मिळतात. ज्यात व्यक्ती चालता-फिरता अचानक पडतो आणि त्याचा जीवही जातो. हार्ट अटॅक येण्याच्या जास्तीत जास्त केसेस पुरूषांमध्ये बघायला मिळतात. एका रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. रिसर्चनुसार, पुरूषांमध्ये ऑफिसमुळे हार्ट अटॅकचा धोका दुप्पट वाढतो.

जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, ज्या पुरूषांना ऑफिसमध्ये त्यांचं कामाचं कौतुक मिळत नाही, त्यांची स्ट्रेस लेव्हल वाढते. यामुळे घातक हार्ट डिजीजचा धोका दुप्पट होतो. 
कॅनडाच्या अभ्यासकांनी साधारण 2 दशकापर्यंत स्ट्रेस आणि एफर्ट रिवार्ड इम्बॅलंस (ERI) चा अभ्यास केला. त्यांनी 6, 465 व्हाइट कॉलर जॉब करणाऱ्या पुरूषांवर 18 वर्ष अभ्यास केला. या लोकांना हृदयाचा कोणताही आजार नव्हता. ज्यात 3118 पुरूष आणि 3347 महिलांचा समावेश होता. ज्यांचं सरासरी वय 45 होतं.

ERI आणि नोकरीचा संबंध

Frontiers in Psychology वर असलेल्या एका दुसऱ्या शोधात ERI बाबत विस्तारीतपणे सांगितलं आहे. या स्थितीत कामाशी संबंधित प्रेशर वाढतं, कारण ऑफिसमध्ये त्यांच्या प्रयत्नाना आणि कामाला पुरेसं प्रोत्साहन मिळत नाही. रिसर्चच्या मुख्य लेखकांनी सांगितलं की, अशा वातावरणात कर्मचाऱ्यांकडून हाय क्वालिटी कामाची डिमांड केली जाते. पण कामावर कंट्रोल कमी असतो. त्यांनी या दोन्ही गोष्टीमुळे हृदयावर पडणाऱ्या प्रभावाबाबत अभ्यास केला.

रिसर्चमध्ये आढळून आलं की, ज्या पुरूष सहभागींना तणावपूर्ण वातावरण किंवा कमी कौतुक मिळालं, त्यांच्यात हृदयरोगाचा धोका 49 टक्के वाढला होता. ज्या पुरूषांना स्ट्रेसफुल वर्क आणि ERI या दोन्हीचा सामना करावा लागला, त्यांना हृदयरोगाचा धोका दुप्पट झाला. तर अभ्यासक या गोष्टींचा महिलांवर काय परिणाम झाला हे स्पष्ट करण्यात अपयशी ठरले.

हार्ट अटॅकचा धोका

हार्ट डिजीजमुळे हृदयापर्यंत पुरेसा रक्त पुरवठा होत नाही. ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. मुख्य लेखक म्हणाले की, बरेच लोक ऑफिसमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवतात. त्यामुळे हा रिसर्च लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यात फार महत्वाची भूमिका निभावेल. यातून असा निष्कर्ष निघतो की, स्ट्रेसफुल वर्क कंडीशन दूर करून कर्मचाऱ्यांसाठी एक हेल्दी वातावरण बनवलं पाहिजे.

Web Title: Study revealed reason of heart attack and cardiovascular disease risk for men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.