नव्या रिसर्चने बसेल तुम्हाला धक्का, 50 पेक्षा कमी वय असलेल्या लोकांनी वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 10:36 AM2023-09-08T10:36:51+5:302023-09-08T10:37:39+5:30
Cancer Disease : एका रिसर्चनुसार, 2019 मध्ये 32 लाख 60 हजार कॅन्सरच्या रूग्णांचं वय 50 पेक्षा कमी होतं.
Cancer Disease : BMJ Oncology वर एक नवीन रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. जो फारच धक्कादायक आहे. यात असं सांगण्यात आलं आहे की, 50 वय असलेल्या लोकांना कॅन्सर वेगाने शिकार बनवत आहे. गेल्या 30 वर्षात याचा दर 79 टक्के वाढला आहे. रिसर्चनुसार, 2019 मध्ये 32 लाख 60 हजार कॅन्सरच्या रूग्णांचं वय 50 पेक्षा कमी होतं.
एका मीडिया रिपोर्टनुसार, या वाढीमागे लठ्ठपणा, डाएटमध्ये रेड मीट, जास्त मीठ आणि शारीरिक हालचाल न करणं यांचा समावेश आहे. ते 14 ते 49 वर्षाच्या रूग्णांमागे जेनेटिक कारण असू शकतं. याबाबत आणखी अभ्यास करण्याची गरज आहे. पण जर तुम्हाला कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर काही पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा.
आहारात फळं-भाज्यांचा समावेश
ताजी फळं आणि भाज्या शरीराला हेल्दी बनवतात. अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, ताजी फळं आणि भाज्या खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो. कारण या रंगीबेरंगी फळं-भाज्यांमधून आवश्यक व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायटोकेमिकल आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स मिळतात. जे कॅन्सरसोबत लढण्यास मदत करतात.
साखर कमी खा
शुगर दोन प्रकारची असते, एक फळं आणि भाज्यांमधून मिळते आणि दुसरी शुगर ड्रिंक्समधून मिळते. दुसऱ्या प्रकारची शुगर कॅन्सर सेल्स वाढवण्यास मदत करते. याने लठ्ठपणा, हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे ही कमी प्रमाणात सेवन करा.
फायबर दूर ठेवेल कॅन्सर
भूक आणि वजन कंट्रोल करण्यासाठी फायबर असलेले फूड्स गरजेचे असतात. पण काही रिसर्च सांगतात की, काही खाद्य पदार्थाने कॅन्सरसारख्या घातक आजारापासून बचाव करण्यास मदत मिळते. हाय फायबर डाएटने कोलन कॅन्सरपासून बचाव केला जाऊ शकतो. हे तत्व तुम्हाला डाळी, शेंगा, सफरचंद, नट्स, फ्लॉवरमधून मिळू शकतात.
ड्रिंकिंग आणि अल्कोहोल बंद करा
शोधात असं आढळून आलं की, जे लोक मद्यसेवन आणि धूम्रपान अधिक करतात, त्यांना कॅन्सरचा धोका अधिक असतो. ज्यात लिव्हर कॅन्सर, लंग कॅन्सर सगळ्यात मुख्य आहे. अशात कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मद्यसेवन आणि धूम्रपान बंद करा.
काय खाऊ नये?
प्रोसेस्ड मीट
फ्राईड फूड
ओवरकुक्ड फूड
फार गोड पदार्थ
जास्त फॅट असलेले पदार्थ
जास्त मीठ असलेले पदार्थ