'या' कारणाने मानसिक विकाराचा अधिक असतो धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 11:09 AM2019-05-04T11:09:45+5:302019-05-04T11:12:03+5:30

एकटं राहिल्याने काय होऊ शकतं याचा वेळोवेळी वेगवेगळ्या रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे.

Study said that living alone increase mental health risk | 'या' कारणाने मानसिक विकाराचा अधिक असतो धोका!

'या' कारणाने मानसिक विकाराचा अधिक असतो धोका!

Next

(Image Credit : IOL)

एकटं राहिल्याने काय होऊ शकतं याचा वेळोवेळी वेगवेगळ्या रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे. आता पुन्हा याविषयीचा एक रिसर्च करण्यात आला आणि यातून सांगण्यात आलं आहे की, एकटं राहिल्याने मानसिक समस्या होण्याचा धोका अधिक राहतो. मग ते कोणत्याही वयाचे स्त्री-पुरूष असो. इतर लोकांच्या तुलनेत एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये मानसिक विकार असतात. 

(Image Credit : The Pioneer)

पीएलओस वन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये इंग्लंडमध्ये राहणाऱ्या १६ ते ६४ वयोगटातील २० हजार ५०० लोकांच्या डेटाचं विश्लेषण केलं. या सर्वच लोकांनी १९९३, २००० आणि २००७ साली नॅशनल सायकियाट्रिक मॉर्बिडिटी सर्व्हेमध्ये सहभाग घेतला होता. 

न्यूरोटिक लक्षणांवर केंद्रित प्रश्वावली क्लिनकल इंटरव्ह्यू शेड्यूल-रिवाइज्डचा उपयोग व्यक्तीच्या सामान्य मानसिक विकाराचं मूल्यांकल करण्यासाठी केला गेला. 

(Image Credit : The Conversation)

यानंतर रिसर्चमध्ये असं आढळलं की, १९९३, २००० आणि २००७ मध्ये एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये मनोविकाराचा दर क्रमश: ८.८ टक्के, ९.८ टक्के आणि १०.७ टक्के होता. त्यासोबतच अभ्यासकांना एकटे राहणारे आणि सामान्य मनोविकार यांच्यात एक संबंध आढळला. 

या रिसर्चनुसार, लोकांच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये मानसिक विकाराचा धोका १.३९ ते २.४३ टक्के वाढतो. या रिसर्चचे सहलेखक लुईस जॅकब म्हणाले की, इंग्लंडमध्ये एकटे राहणे सामन्य लोकांमध्ये मनोविकारासोबत सकारात्मक रूपाने जुळले आहे. 

वैश्विक स्तरावर सामान्य मानसिक विकाराचा दर जवळपास ३० टक्के आहे. या मानसिक विकाराचा आपल्या जीवनावर गंभीर प्रभाव पडतो. या रिसर्चच्या अभ्यासकांनी सल्ला दिला आहे की, लोकांसोबत उठण्या-बसण्याने एकटेपणातून बाहेर येण्यास मदत होते. 

Web Title: Study said that living alone increase mental health risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.