मदत मागण्याचा 'हा' फायदा वाचाल तर कधीच वाटणार नाही कमीपणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 10:54 AM2020-02-06T10:54:10+5:302020-02-06T10:57:58+5:30
अलिकडे मनापासून मदत करणारे लोक फारच कमी दिसतात. पण मदत करणे हा एक मानवी स्वभाव आहे. तुम्ही तेव्हाच कुणाची मदत करू शकता जेव्हा तुमच्यात लोकांबाबत दयाळू वृत्ती आणि उदारता असेल.
(Image Credit : skipprichard.com)
अलिकडे मनापासून मदत करणारे लोक फारच कमी दिसतात. पण मदत करणे हा एक मानवी स्वभाव आहे. तुम्ही तेव्हाच कुणाची मदत करू शकता जेव्हा तुमच्यात लोकांबाबत दयाळू वृत्ती आणि उदारता असेल. अनेकदा आपण न मागताही समोरच्या व्यक्तीची गरज ओळखून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करतो. पण अनेकदा आपल्या जवळचेच लोक महत्वाच्या क्षणी मदत मागण्यास अडखळतात.
अशात नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले आहे की, मदत मागितल्याने तुमची पर्सनॅलिटी अधिक चांगली होते.
अनेकदा अनेक लोक कमी वाटेल म्हणून गरजेच्यावेळी देखील मदत मागत नाहीत. काम रखडतं तरी सुद्धा इगो धरून ठेवतात, पण मदतीसाठी काही हात पुढे करत नाही. अशांसाठी हा रिसर्च महत्वाचा ठरणार आहे. कारण या रिसर्चमधून समोर आलं आहे की, परिवार किंवा सहकाऱ्यांकडून मदत घेतल्याने तुमचं व्यक्तिमत्व सुधारतं.
(Image Credit : robdonnellytherapy.com)
रिसर्चमधून हेही सांगण्यात आलं आहे की, जे लोक तुम्हाला तुमच्या ध्येयाबाबत आठवण करून देतात आणि ते मिळवण्यासाठी तुमची मदत करतात ते तुमचं व्यक्तिमत्व अधिक चांगलं करण्याचं काम करतात.
व्यक्तिमत्वात आयुष्यभरासाठी बदल
असे मानले जाते की, एकदा एखाद्या व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व तयार होतं ते बदलता येत नाही. पण या रिसर्चमधून समोर आलं आहे की, व्यक्तित्वात आयुष्यभर बदल होत राहतात. जीवनात घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रमुख घटनांमुळे लोकांच्या व्यक्तिमत्वात बदल येतो.
युनिव्हर्सिटी ऑफ एरिझोनाच्या अभ्यासकांनी केलेला हा रिसर्च जर्नल ऑफ रिसर्च इन पर्सनॅलिटीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या रिसर्चमधून हे समजून येतं की, लोक कॉलेज दरम्यान जास्त कर्तव्यनिष्ठ आणि अनेक गोष्टींवर त्यांची सहमती असते. लग्नानंतर ते बहिर्मुख होतात आणि निवृत्तीच्या वयात पुन्हा सहमतीचा व्यवहार धारण करतात.