रात्री झोप येत नसेल तर आधी समजून घ्या शरीराचं तापमान आणि झोपेचं कनेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 01:21 PM2019-07-23T13:21:28+5:302019-07-23T13:26:39+5:30
बदलती लाइफस्टाईल, कामाचा वाढता स्ट्रेस यामुळे जगभरातील लोकांना चांगली झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
(Image Credit : Dunya News)
बदलती लाइफस्टाईल, कामाचा वाढता स्ट्रेस यामुळे जगभरातील लोकांना चांगली झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. इतकेच काय तर झोप येण्यासाठी लोकांना झोपेच्या गोळ्याही घ्याव्या लागत आहेत. सोबतच झोप पूर्ण झाल्याने किंवा येत नसल्याने वजन वाढण्यासोबतच वेगवेगळे आजारही होत आहेत. मात्र, अशात एका रिसर्चमधून झोपेची समस्या असणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनसार, झोपण्याच्या साधारण १ ते २ तासआधी आंघोळ केल्याने तुम्हाला चांगली झोप लागू शकते. म्हणजे तुम्हाला झोप न येण्याची समस्या आंघोळीने दूर केली जाऊ शकते.
(Image Credit : Heatworks)
शरीराचं तापमान आणि झोपेचा संबंध
(Image Credit : India TV)
या रिसर्चमध्ये शरीराचं तापमान आणि झोपेची क्वॉलिटी यांचा संबंध बघितला गेला. यातून आढळलं की, जे लोक झोपेच्या १ ते २ तासआधी आंघोळ करतात त्यांना चांगली झोप येते. झोपणे आणि जागणे यात शरीराच्या तापमानाची महत्त्वाची भूमिका असते. शरीराचं तापमान झोपताना सर्वात कमी असतं. दुपारी आणि सायंकाळी शरीराचं तापमान थोडं जास्त असतं.
बॉडी क्लॉकवर तापमान अवलंबून
(Image Credit : Psycom.net)
शरीराच्या बॉडी क्लॉकवर शरीराचं तापमान अवलंबून असतं. हे तापमान झोपण्यापूर्वी थोडं कमी होतं. झोपेत असताना तापमान सर्वात कमी असतं आणि अर्ध्या रात्री तापमान हळूहळू वाढतं. याप्रकारे आपलं शरीरच अलार्मचं काम करतं आणि सकाळी आपल्याला उठवतं. याप्रकारे टेम्प्रेचर सायकल आणि स्लीप सायकल एकमेकांशी जुळलेल्या आहेत.
(Image Credit : The Week)
हे जर समजून घेतलं तर झोपण्यापूर्वी शरीराचं तापमान कमी करून तुम्ही लवकर आणि चांगली झोप मिळवू शकता. बेडवर जाण्याच्या साधारण ९० मिनिटेआधी आंघोळ केल्यास शरीराचं तापमान कमी होऊन तुम्ही चांगली झोप घेऊ शकता.