'या' कारणाने सुद्धा वाढतो अस्थमाचा धोका, पण याकडे नेहमीच केलं जातं दुर्लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 09:44 AM2019-10-21T09:44:17+5:302019-10-21T09:49:35+5:30
ओव्हरवेट म्हणजे सामान्यापेक्षा जास्त वजन असल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो, हे आता कुठे लोकांना कळू लागले आहे. या वेगवेगळ्या आजारांमध्ये अस्थमा हा आजार आहे.
(Image Credit : standard.co.uk)
ओव्हरवेट म्हणजे सामान्यापेक्षा जास्त वजन असल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो, हे आता कुठे लोकांना कळू लागले आहे. या वेगवेगळ्या आजारांमध्ये अस्थमा हा आजार आहे. युरोपियन रेस्पिरेटरी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, अधिक फॅटमुळे श्वासांसंबंधी आजारांचा धोका वाढत आहे. अशात गरजेचं आहे की, खाणं-पिणं नियमित आणि नियंत्रित ठेवलं जावं, जेणेकरून लठ्ठपणाची समस्या होऊ नये.
(Image Credit : independent.co.uk)
वैज्ञानिकांनी याआधीही असा दावा केला आहे की, जास्त वजन असल्याने व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. म्हणजे त्यांना अस्थमाची समस्या होऊ शकते. आता नुकत्याच समोर आलेल्या रिसर्चनुसार, यावर शिक्कामोर्तब केलं आहे. रिसर्चचे लेखक जॉन इलयॉट जे पर्थ वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील गार्डनर हॉस्पिटलचे रिसर्च ऑफिसर आहेत.
(Image Credit : netralnews.com)
त्यांनी सांगितले की, त्यांच्या टिमने श्वसन तंत्रावर पूर्ण रूपाने अभ्यास केला. तेव्हा त्यांना आढळलं की, फॅटी टिश्यूजमुळे फुप्फुसाच्या वायुमार्गात समस्या निर्माण होते, ज्यामुळे श्वसनासंबंधी समस्या वाढते. जॉन म्हणाले की, आम्ही डोनेटेड लंग्स म्हणजे फुप्फुसांवर रिसर्च केला. यातील एकूण ५२ सॅम्पल होते, ज्यातील १५ असे होते ज्यांना अस्थमाची समस्या नव्हती. २१ असे होते ज्यांना अस्थमा तर होता, पण त्यांचा मृत्यू दुसऱ्याच कारणाने झाला होता. त्याव्यतिरिक्त इतर १६ लोक असे होते, ज्यांच्या मृत्युचं कारण अस्थमा होतं. या सर्वांमधील फॅटी टिश्यू चेक केलं गेलं.
(Image Credit : parenting.firstcry.com)
जॉन म्हणाले की, यातून समोर आले की, फॅटी टिश्यूजमुळे बॉडी मास इंडेक्स वाढतो. त्यासोबतच फुप्फुसाच्या वायुमार्गात समस्या होते. ज्यामुळे संक्रमण वाढतं. अशात फुप्फुसं कार्बन डायऑक्साइड काढणे आणि पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन योग्य प्रकारे ग्रहण करत नाही. याचा परिणाम असा होतो की, वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. म्हणजे श्वास भरून येणे, घाबरल्यासारखं होणे आणि अस्थमाची समस्या वाढते.