ब्रेस्ट कॅन्सरमुळे वाढतो हृदयरोगाचा धोका, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 10:06 AM2019-06-20T10:06:29+5:302019-06-20T10:14:04+5:30

एका रिसर्चमधून अभ्यासकांना ही माहिती मिळाली आहे. या रिसर्चचे निष्कर्ष मेनोपॉज : द जर्नल ऑफ द नॉर्थ अमेरिकन मेनोपॉज सोसायटी नावाच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित करण्यात आलाय.

Study says breast cancer increases the risk of heart disease in cancer survivors | ब्रेस्ट कॅन्सरमुळे वाढतो हृदयरोगाचा धोका, वेळीच व्हा सावध

ब्रेस्ट कॅन्सरमुळे वाढतो हृदयरोगाचा धोका, वेळीच व्हा सावध

Next

(Image Credit : rd.com)

रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज स्थितीत असलेल्या महिलांना जर ब्रेस्ट कॅन्सर झाला तर अशा महिलांमध्ये हृदयरोग होण्याचा धोकाही अनेक पटीने वाढतो. एका रिसर्चमधून अभ्यासकांना ही माहिती मिळाली आहे. या रिसर्चचे निष्कर्ष मेनोपॉज : द जर्नल ऑफ द नॉर्थ अमेरिकन मेनोपॉज सोसायटी नावाच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित करण्यात आलाय.

कीमो आणि रेडिएशनमुळे हृदयरोगांचा धोका

(Image Credit : Drug Target Review)

व्हर्जिनिया विश्वविद्यालयातील प्राध्यापक जोआन पिंकर्टन म्हणाले की, 'कीमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि एरोमाटेज इनहिबिटर्सच्या उपयोग केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार घेत असलेल्या महिलांमध्ये हृदयरोग अधिक बघितला जातो. विकिरणांच्या संपर्कात आल्यावर ५ वर्षांनी हा हृदयरोग होऊ शकतो आणि याचा धोका ३० वर्षांपर्यंत कायम राहतो'.

धोका कसा होईल कमी?

(Image Credit : Funender)

पिंकर्टन म्हणाले की, 'जर तुम्हाला तुमचं हृदय निरोगी ठेवायचं असेल तर हेल्दी लाइफस्टाईल अंगीकारा. कारण हाच एक उपाय आहे, ज्याने ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा होण्यापासून रोखला जाऊ शकतो. सोबतच हृदयरोग होण्याचा धोकाही याने कमी केला जाऊ शकतो'.

रूग्ण आणि सामान्य महिलेत तुलना

ब्रेस्ट कॅन्सरमधून बचावलेल्या महिला आणि ज्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर आहे. जर त्या पोस्ट मेनोपॉजच्या स्टेजमध्ये असतील तर अशा महिलांमध्ये हृदयरोगाचा धोका आणि कारणांची तुलना व मुल्यांकन करणे या रिसर्चचा उद्देश होता. या रिसर्चसाठी निवडल्या गेलेल्या सर्व महिला मेनोपॉज पार केलेल्या होत्या. यातील ९० ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हाइवर महिलांची तुलना १९२ सामान्य महिलांशी केली गेली.

हृदयरोगाचे रिस्क फॅक्टर्स

(Image Credit : The Conversation)

अभ्यासकांना आढळलं की, ज्या महिला ब्रेस्ट कॅन्सर सर्वाइवर होत्या त्यांच्यात मेटाबॉलिक सिंड्रोम, डायबिटीस, एथेरोस्लेरोसिस आणि लठ्ठपणाची अनेक लक्षणे दिसली, तर ते हृदयरोगाशी संबंधित आजार होण्याचा सर्वात मोठा रिस्क फॅक्टर मानले जातात. सोबतच हृदयरोगाने मृत्यू होण्याच्या केसेसही कॅन्सरप्रमाणे अधिक आढळल्या.

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

(Image Credit : Medical News Today)

स्तनाच्या आकार बदल जाणवणे, स्तन किंवा बाहूच्या खाली गाठ येणे, स्तन दाबल्यास वेदना होणे, स्तनातून चिकट पदार्थ बाहेर येणे, निप्पलचा पुढील भाग वाकणे किंवा लाल होणे, स्तनांमध्ये सूज येणे ही ब्रेस्ट कॅन्सरचा प्रमुख लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कशी घ्याल काळजी?

एक्सरसाइज आणि योगा नियमितपणे करावा

मिठाचं अत्याधिक सेवन करू नये

लाल मांसाचं अधिक सेवन करू नये

सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव करा

अधिक प्रमाणात धुम्रपान किंवा मद्यसेवन करू नये

Web Title: Study says breast cancer increases the risk of heart disease in cancer survivors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.