संडासला गेल्यावर अजिबात करू नका 'ही' चूक, अभ्यासकांनुसार हार्ट अटॅकचा वाढतो धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 11:05 AM2024-08-27T11:05:28+5:302024-08-27T11:40:46+5:30
Constipation : बद्धकोष्ठतेची समस्या चुकीची लाइफस्टाईल किंवा चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे होते. ही समस्या असलेल्या व्यक्तीला मलत्याग करण्यास म्हणजे पोट साफ होण्यास अडचण येते.
Constipation : बद्धकोष्ठतेची समस्या आजकाल अनेक लोकांना होते. याची वेगवेगळी कारणे असतात. ही समस्या कॉमन जरी असली तरी यावर वेळीच उपचार केले नाही तर इतरही गंभीर समस्या होण्याचा धोका असतो. बद्धकोष्ठतेची समस्या चुकीची लाइफस्टाईल किंवा चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे होते. ही समस्या असलेल्या व्यक्तीला मलत्याग करण्यास म्हणजे पोट साफ होण्यास अडचण येते. ज्या लोकांना पोटासंबंधी समस्या असतात त्यांना इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. इतकंच नाही तर बद्धकोष्ठतेची समस्या जास्त काळ राहिली तर हृदयरोगाचा धोका देखील असतो.
ऑस्ट्रेलियातील काही अभ्यासकांनी नुकताच एक रिसर्च केला. ज्यात त्यांना आढळलं की, बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या लोकांना हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशर आणि स्ट्रोकचाही धोका असतो. जर संडास करताना तुम्हाला जोर लावावा लागत असेल तर याचा थेट प्रभाव हृदयावर पडतो.
कशी होते ही समस्या?
बद्धकोष्ठतेची समस्या वेगवेगळ्या कारणाने होत असते. खाण्या-पिण्यात काही गडबड, फायबर असलेल्या पदार्थांचं सेवन कमी करणे किंवा वाढत्या वयात ही समस्या होणं कॉमन आहे. त्याशिवाय काही औषधांच्या सेवनाने, पाणी किंवा तरल पदार्थांचं सेवन कमी करणे यामुळे सुद्धा ही समस्या होते. कोलनमधील पाणी कमी झाल्याने मल कठोर होतं आणि सहजपणे बाहेर येत नाही. अशात आतड्यांमध्ये ते जमा होऊ लागतं.
इतर काही कारणे
शारीरिक हालचाल न करणे
बरेच लोक एकाच जागी बसून तासंतास काम करतात. काही लोक अजिबात शारीरिक हालचाल करत नाहीत. अशांना बद्धकोष्ठतेची समस्या होते. पायी चालणं, थोडी एक्सरसाइज केली तर ही समस्या दूर होऊ शकते.
चिंता आणि तणाव
सतत वेगवेगळ्या कारणांची चिंता करणे आणि तणाव घेणे यामुळेही बद्धकोष्ठतेची समस्या होते. अशात चिंता आणि तणाव दूर करण्यावर भर दिला पाहिजे.
हार्ट अटॅकचा धोका
जर बद्धकोष्ठतेची समस्या नेहमीच राहत असेल तर कोलनमध्ये मल जमा होतं ज्यामुळे बाउल मुव्हमेंट प्रभावित होते. अशात शरीरात सूज येऊ लागते. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अभ्यासकांना आढळलं की, ज्या लोकांना हाय बीपीसोबत बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.
कशी दूर करावी समस्या?
- आहारात फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा
- दिवसभर भरपूर पाणी प्या
- मसालेदार आणि तेलकट पदार्थ कमी खा
- सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या
- चिया सीड्स आणि अळशीच्या बियांमध्ये सोल्यूबल फायबर भरपूर असतं. सोल्यूबल फायबर पाण्यात विरघळतं आणि मल मुलायम करतं.
- टोमॅटो आणि कोथिंबिरीचा ज्यूस प्यायल्यानेही बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत मिळते. काही टोमॅटो घेऊन त्यात कोथिंबिर टाकून ज्यूस तयार करा. यात थोडा चाट मसाला टाका.
- सफरचंदामध्ये भरपूर फायबर असतं. जे तुमची ही बद्धकोष्ठतेची समस्या दूर करू शकतं.
- रात्री एक ग्लास दुधात एक चमचा तूप मिक्स करून सेवन केल्यास सकाळी पोट सहजपणे साफ होईल.
- अंजीर, केळी, संत्री खाऊनही तुम्ही ही समस्या दूर करू शकता.
एक्सरसाईज
योग्य आहारासोबत तुम्ही रोज एक्सरसाईज करणं फायदेशीर ठरतं. याने तुमच्या पोटाचं आरोग्य चांगलं तर राहतंच सोबतच इतर आजारांचा धोका देखील कमी होतो. रोज सकाळी आणि सायंकाळी किमान अर्धा तास तुम्ही एक्सरसाईज केली पाहिजे.