Coronavirus : नवा खुलासा! सर्दी-खोकल्याआधीही दिसू लागतात कोरोनाची 'ही' लक्षणे, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 02:05 PM2020-06-13T14:05:12+5:302020-06-13T14:05:35+5:30
हा रिसर्च अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिनकडून करण्यात आलाय. हा रिसर्च एनल्स ऑफ न्यूरॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलाय.
कोरोना व्हायरसची लागण झाली असेल तर सर्दी, खोकला आणि ताप ही सामान्य लक्षणे आहेत. पण एका नव्या रिसर्चमध्ये समोर आलं आहे की, या लक्षणांआधी कोविडच्या अनेक रूग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसू लागतात. हा रिसर्च अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिनकडून करण्यात आलाय. हा रिसर्च एनल्स ऑफ न्यूरॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलाय.
(Image Credit : medscape.com)
हॉस्पिटलमध्ये दाखल रूग्णांपैकी अर्ध्यांमध्ये कोविड 19 चे न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसलेत, ज्यात डोकेदुखी, चक्कर येणे, लक्ष केंद्रीत करण्यात अडचण येणे, गंध किंवा टेस्ट न लागणे, स्ट्रोक, कमजोरी आणि मांसपेशींमध्ये वेदना यांचाही समावेश आहे.
या रिसर्चचे मुख्य लेखक आणि न्यूरो-संक्रामक रोगांचे नॉर्थवेस्टर्न मेडिसिन चीफ डॉक्टर इगोर कोरालनिक म्हणाले की, 'सामान्य जनता आणि चिकित्सकांना याबाबत माहीत असणं गरजेचं आहे. कारण कोरोना व्हायरस इन्फेक्शन ताप, खोकला आणि श्वासाच्या समस्येआधीच शरीरात न्यूरोलॉजिक लक्षणांसोबत असू शकतो'.
कोरोना व्हायरस मेंदू, पाठीचा कणा, मांसपेशींसहीत संपूर्ण नर्वस सिस्टीमला प्रभावित करतो. डॉक्टर कोरालनिक म्हणाले की, कोविड चे अनेक वेगवेगळे प्रकार न्यूरोलॉजिकल डिस्फंक्शनचे कारण बनू शकतात. हा आजार खासकरून फुप्फुसे, किडनी आणि हृदयावर जास्त प्रभाव टाकतो. पण ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे याचा प्रभाव मेंदूवरही पडू शकतो.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे क्लॉटिंग डिसऑर्डर सुद्धा होऊ शकतं. ज्यामुळे रूग्णाला इस्कीमिक किंवा हमरेजिक स्ट्रोकही होऊ शकतो. हा व्हायरस मेंदू आणि मेनिन्जेसमध्ये प्रत्यक्ष संक्रमणचं कारण ठरू शकतो. त्यासोबतच इम्यून सिस्टीममध्ये सूज निर्माण होऊ शकते. ज्यामुळे मेंदू आणि तंत्रिका खराब होऊ शकतात.
डॉक्टर कोरलनिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक न्यूरो-कोविड रिसर्च टीम तयार केली. आणि हॉस्पिटलमध्ये दाखल सर्वच रूग्णांवर गंभीर विश्लेषण सुरू केलं. जेणेकरून न्यूरोलॉजिकल समस्यांचा प्रकार आणि त्यावरील उपचारावर काम केलं जाऊ शकेल.
Coronavirus : वैज्ञानिकांचा दावा; कोरोनासोबत लढण्यासाठी सद्या टीबीची लस सर्वात प्रभावी, पण का?
Coronavirus : काही कोरोना व्हायरस रूग्णांचं ऑक्सिजन वेगाने होतं कमी आणि मग वाढतो धोका....