रडण्यामुळे वजन होते कमी! खुद्द तज्ज्ञच सांगातायत वजन कमी करण्याचा हा अनोखा फंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 12:47 PM2021-10-04T12:47:48+5:302021-10-04T13:02:28+5:30
रडणे तुमचे वजन कमी करण्यास मदत करू शकते. मात्र एक गोष्ट, लक्षात ठेवा खोटे रडल्याने तुमचे वजन अजिबात कमी होणार नाही.
वजन नियंत्रित करण्यासाठी आपण काय करावे? आहारावर नियंत्रण ठेवण्यापासून ते तासभर व्यायाम केला तरीही काहीवेळा लठ्ठपणापासून सुटका होत नाही. तुम्हाला माहीत आहे की वजन नियंत्रित करण्यासाठी फक्त तुमचा आहार आणि व्यायामच प्रभावी नाही, तर तुम्ही रडून तुमचे वजन नियंत्रित करू शकता. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की रडणे वजन कमी करण्यास मदत करते.
रडणे तुमच्या भावनांशी जोडलेले आहे. ही भावनिक कृती आहे. तुम्ही दुःखी असता तेव्हा रडता. रडणे तुमचे वजन कमी करण्यास मदत करू शकते. मात्र एक गोष्ट, लक्षात ठेवा खोटे रडल्याने तुमचे वजन अजिबात कमी होणार नाही.
जेव्हा आपण रडतो तेव्हा आपले शरीर कोर्टिसोल हार्मोन सोडते. आपल्या शरीरातील कोर्टिसोल हार्मोनच्या वाढलेल्या पातळीमुळे चरबी कमी होते. तणावामुळे बाहेर पडलेले अश्रू आपल्या शरीरातून विष बाहेर काढण्यास मदत करतात, जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
विलियम फ्रे, या प्रख्यात बायोकेमिस्टने , या अभ्यासाच्या निष्कर्षांचे समर्थन केले आहे . अश्रूंचे रहस्य या नावाने प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात संशोधक विल्यम फ्रे यांनी अश्रूंचा मानवी आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासानुसार, जर तुमचे अश्रू खरे असतील, तरच तुम्ही रडल्याने चरबी जाळू शकता.
अश्रूंचे प्रकार
अश्रूंचे तीन प्रकार आहेत. मूलभूत, अनैच्छिक आणि मानसिक अश्रू. मूलभूत अश्रू ते आहेत जे आपल्या डोळ्यांना ओलसर ठेवतात, अनैच्छिक अश्रू ते असतात जे आपण नकळत धूर किंवा प्रदूषणामुळे येतात आणि मानसिक अश्रू मानवी भावनांशी संबंधित असतात.
भावनिक अश्रू किंवा भावनिक रडणे शरीराच्या संप्रेरकांशी जोडलेले असते. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो तेव्हा आपल्या हृदयाचे स्नायू तासाला सुमारे साडेआठ कॅलरीज बर्न करतात. जेव्हा आपण तणावात असतो, तेव्हा आपल्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते. ही हृदयाच्या स्नायूंनी जाळलेल्या कॅलरीजची संख्या वाढवू शकते.
अश्रूंमागील विज्ञान काय आहे ?
संध्याकाळी ७ ते १० या वेळेत तुम्ही तुमच्या नकारात्मक भावनांपासून मुक्त होऊ शकता. रडण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे, कारण या काळात कोर्टिसोन रिलीझिंग इफेक्ट सर्वात जास्त असतो. जेव्हा तुम्ही रडता तेव्हा शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी होते ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
रडणे किती फायदेशीर आहे?
परंतु फक्त यामुळे वजन नियंत्रित होत नाही. आपल्या आहार आणि व्यायामासह भावनिक पैलू सक्रिय ठेवून रडले , तरच आपण वजन नियंत्रित करू शकता.