'डेडलाइन पूर्ण करण्याचं प्रेशर बॉसपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर असतं'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:48 AM2019-07-18T11:48:36+5:302019-07-18T11:55:39+5:30

कॉर्पोरेट विश्वात काम करणे आणि आपली नोकरी टिकवून ठेवणे सोपं काम नसतं. तासंतास सतत काम करणे आणि ठरलेल्या वेळेत काम करणे या गोष्टींमुळे तणावाचं प्रमाण अधिकच वाढतं.

Study says Employee are always more stressed than your boss | 'डेडलाइन पूर्ण करण्याचं प्रेशर बॉसपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर असतं'

'डेडलाइन पूर्ण करण्याचं प्रेशर बॉसपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर असतं'

Next

(Image Credit : Verywell Mind)

कॉर्पोरेट विश्वात काम करणे आणि आपली नोकरी टिकवून ठेवणे सोपं काम नसतं. तासंतास सतत काम करणे आणि ठरलेल्या वेळेत काम करणे या गोष्टींमुळे तणावाचं प्रमाण अधिकच वाढतं. या स्ट्रेससोबत तुम्हाला करिअरमध्येही पुढे जायचं असतं. जर्नल ऑफ जेरोनटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार, ज्यूनिअर लेव्हलचे कर्मचारी हे मॅनेजरपेक्षा जास्त तणावात असतात.

काय सांगतो रिसर्च?

मॅनचेस्टर विश्वविद्यालय, यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि एसेक्स विश्वविद्यालयाद्वारे करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी कर्मचाऱ्यांच्या दिवसभरातील वेगवेगळ्या वेळेतील सलाईवा सॅम्पल घेऊन कोर्टिसोलच्या प्रमाणाची तपासणी केली. कोर्टिसोल एक एड्रेनल हार्मोन आहे, ज्याचं प्रमाण तणावामुळे वाढतं.

(Image Credit : thepublicdiscourse.com)

या रिसर्च दरम्यान अभ्यासकांनी सहभागी लोकांचा लिंग, वय, झोप घेण्याचे तास आणि सिगारेट ओढतात की नाही यावरही लक्ष दिलं. अभ्यासकांनी सहभागी लोकांनी काम करण्याच्या पद्धतीवर काही केलं नाही. पण त्यांनी स्ट्रेल लेव्हल आणि काम यात संबंध पाहिला. 

कोर्टिसोल लेव्हल

सामान्यपणे सकाळी कोर्टिसोल लेव्हल जास्त असतो आणि रात्री खासकरून झोपण्यादरम्यान कमी राहतो. अभ्यासकांना आढळलं की, उच्च पदावरील कर्मचाऱ्यांमध्ये कोर्टिसोल लेव्हल तेवढा कमी नाही झाला, जेवढा कर्मचाऱ्यांचा झाला. यावरून हे कळतं की, लो लेव्हलला तणाव जास्त असतो.

(Image Credit : Health Magazine)

अभ्यासकांनी सांगितले की, खालच्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांची स्थिती फार खराब असते. त्यांना पगार तर कमी मिळतोच, सोबतच कामावर नियंत्रण असणे, आर्थिक रूपाने भविष्याच धोक्यात राहणे आणि सीनिअर्सची मदत न मिळणे यांसारख्या अडचणींचा सामना करावा लागतो.

निवृत्तीपर्यंत राहते समस्या

यासोबतच निवृत्तीपर्यंत कर्मचाऱ्यांचं कोर्टिसोलचं प्रमाण वाढलेलं राहतं आणि उच्च पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये तणाव कमी राहतो. 

(Image Credit : The American Institute of Stress)

ही स्थिती वाईट

यात जराही शंका नाही की, तणावाचा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. आता कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यादायी आणि स्ट्रेस फ्री वातावरण निर्माण करण्यावर काम करायला पाहिजे.

Web Title: Study says Employee are always more stressed than your boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.