७० टक्के लोकांनी 'हा' उपाय केल्यास नियंत्रणात येईल कोरोनाचा प्रसार; संशोधनातून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 11:30 AM2020-11-26T11:30:58+5:302020-11-26T11:43:30+5:30
CoronaVirus News & latest Updates : मास्क वापरल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होतो म्हणून सर्वच ठिकाणी मास्क वापरण्याबाबत सक्ती करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या माहामारीला आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. पण अजूनही काही लोक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्यामुळे संक्रमणाचा वेग वाढत आहे. मास्क वापरल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होतो म्हणून सर्वच ठिकाणी मास्क वापरण्याबाबत सक्ती करण्यात आली आहे. ७० टक्के लोकांनी सतत मास्क लावला तर कोरोनाच्या माहामारीला व्यापक होण्यापासून वाचवता येऊ शकतं.
या संशोधनात दिसून आलं की, साधारण कापडाने तोंड झाकल्यानं संक्रमण पसरण्याचा धोका कमी होतो. 'फिजिक्स ऑफ फ्लुइड्स' या पत्रकात हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनात फेसमास्कवर अभ्यास करण्यात आला होता. यात असं दिसून आलं की, मास्कच्या वापरामुळे एका व्यक्तीकडून इतरांपर्यंत पोहोचणारं संक्रमण कमी होतं.
नोटांद्वारे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका? बँकेच्या संशोधनात मोठा खुलासा
या अभ्यासानुसार प्रभावशाली फेस मास्क ७० टक्के लोकांनी वापरल्यास सार्वजनिक ठिकाणांमध्ये पसरणारा कोरोनाचा धोका कमी होईल. यामुळे माहामारीला वाढण्यापासून रोखलं जाऊ शकतं. रिपोर्ट्सनुसार या संशोधकनात नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे तज्ज्ञ संजय कुमार यांचाही समावेश होता.
चिंताजनक! ९४ टक्के यशस्वी लसीनेही कोरोनाचा प्रसार थांबणार नाही, मॉर्डनाच्या तज्ज्ञांचा दावा
सध्या भारताभरासह जगभरात कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरत आहे. लोकांनी सावधगिरी बाळगल्यास, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केल्यास संक्रमणाचा धोका कमी होतो. कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणं, साबणाने हात धुणं, सॅनिटायजरचा वापर, सोशल डिस्टेंसिंग पाळणं, गर्दीच्या ठिकाणी जायचे टाळणं या नियमांचे पालन करायला हवे.
प्लाझ्मा स्प्रे ने 30 सेकंदांत कोरोना होईल नष्ट
मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टी हवेतील, हातावरील व्हायरस नाकात जाण्यापासून रोखू शकतात परंतू तो व्हायरस मुळापासून नष्ट करू शकत नाहीत. यामुळे वस्तूंवर बसलेला कोरोना व्हायरस वेळीच नष्ट करणे खूप गरजेचे ठरणार आहे. एका नवीन संशोधनानुसार प्लाझ्माचा स्प्रे धातू, चामडे आणि प्लॅस्टिकच्या पृष्ठभागाला चिकटलेला कोरोनाव्हायरस अवघ्या 30 सेकंदांत मारू शकतो. हे संशोधन कोरोनाच्या लढाईत मोठी भूमिका निभावण्याची आशा निर्माण झाली आहे. प्लाझ्मा हा पदार्थाच्या चार महत्वाच्या अवस्थांपैकी एक आहे.
हा प्लाझ्मा स्थिर गॅसवर गरम करून किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटीक फील्डच्या संपर्कात आणत बनविता येणार आहे. हे संशोधन फिजिक्स ऑफ फ्लूड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. जूनमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये कोल्ड प्लाझ्माचा उपयोग धातू, चामडे आणि प्लास्टिकसारख्या वस्तूंवर करण्यात आले. यावर बसलेले कोरोना व्हायरससारखे असंख्य विषाणू काही सेकंदांत नष्ट झाल्याचे दिसून आहे.