सतत आनंदी रहायचं असेल तर एक्सट्रोव्हर्ट्सप्रमाणे वागा, जाणून घ्या एक्सट्रोव्हर्ट्स म्हणजे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 10:38 AM2019-09-17T10:38:10+5:302019-09-17T10:53:13+5:30
तुमचं आनंदी राहणं किंवा तुमचा मूड चांगला राहणं हे तुमच्या वागण्या-बोलण्यावर अवलंबून असतं.
(Image Credit : medicaldaily.com)
जगभरातील लोकांना त्यांच्या स्वभावाच्या आधारावर तीन कॅटेगरीजमध्ये विभागलं जाऊ शकतं. एक्सट्रोव्हर्ट, इंट्रोव्हर्ट आणि एंबीव्हर्ट या त्या तीन कॅटेगरीज. एक्सट्रोव्हर्ट लोक मोकळ्या स्वभावाचे असतात, तर इंट्रोव्हर्ट लोक कमी बोलतात आणि गर्दीपासून दूर राहणं पसंत करतात. लोकांची त्यांची त्यांची आवड असते, अशात एका रिसर्चमधून समोर आले आहे की, एक्सट्रोव्हर्ट लोकांचा मूड इंट्रोव्हर्ट लोकांच्या तुलनेत अधिक चांगला राहतो.
(Image Credit : healthline.com)
या रिसर्चमध्ये १३१ लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांना इंट्रोव्हर्ट आणि एक्सट्रोव्हर्ट दोन्ही प्रकारचे व्यवहार करण्यास सांगण्यात आले. या लोकांनी आधी विचारण्यात आलं नव्हतं की, ते एस्कट्रोव्हर्ट आहेत की, इंट्रोव्हर्ट आहेत. केवळ त्यांना असा व्यवहार करण्यास सांगण्यात आलं होतं. सहभागी लोकांना ढोबळमानाने या ग्रुप्समध्ये विभागण्यात आलं होतं.
(Image Credit : today.com)
एक्सट्रोव्हर्टप्रमाणे वागण्यासाठी त्यांना स्पॉन्टेनिअस, बडबड करणे आणि बिनधास्त व्हायचं होतं. इंट्रोव्हर्ट होण्यासाठी त्यांनी शांत आणि रिझर्व रहायचं होतं. नंतर त्यांना सर्व्हेच्या माध्यमातून त्यांच्या आनंदाबाबत प्रश्न विचारण्यात आलेत. समोर आलं की, जे लोक एक्सट्रोव्हर्टप्रमाणे वागत होते, त्यांचा मूड इंट्रोव्हर्ट्सच्या तुलनेत अधिक चांगला होता.
(Image Credit : wellandgood.com)
रिसर्चच्या लेखकांनुसार, एक्सट्रोव्हर्ट लोकांना इंट्रोव्हर्ट्सप्रमाणे व्यवहार केल्याने जास्त फायदा होणार नाही. पण इंट्रोव्हर्ट लोक जेव्हा एक्सट्रोव्हर्ट्सप्रमाणे अॅक्टिंग करू लागले तेव्हा ते फार आनंदी दिसले. रिसर्चनुसार, जर लोकांमध्ये इंट्रोव्हर्ट प्रवृत्ती असेल तर ते जाणून बुजून एक्सट्रोव्हर्ट व्यवहार करतात, तेव्हा त्यांना फायदा होतो.
जर संपूर्ण रिसर्चचा सारांश समजून घेतला तर असे सांगता येईल की, तुमची पर्सनॅलिटी तुमच्या आनंदी आणि निरोगी असण्यात फार मोठी भूमिका बजावते.