'या' लोकांना असतो त्वचेच्या कॅन्सरचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 10:42 AM2020-02-14T10:42:18+5:302020-02-14T11:17:30+5:30

वेगवेगळ्या कॅन्सरबाबत नेहमीच काहीना काही नवीन गोष्टींचा खुलासा होत असतो. तसाच स्कीन कॅन्सरबाबत नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून एक आश्चर्यकारक खुलासा करण्यात आला आहे.

Study says Gay and Bisexual men are more likely to get skin cancer | 'या' लोकांना असतो त्वचेच्या कॅन्सरचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा!

'या' लोकांना असतो त्वचेच्या कॅन्सरचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा!

googlenewsNext

वेगवेगळ्या कॅन्सरबाबत नेहमीच काहीना काही नवीन गोष्टींचा खुलासा होत असतो. तसाच स्कीन कॅन्सरबाबत नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून एक आश्चर्यकारक खुलासा करण्यात आला आहे. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, गे आणि बायसेक्शुअल लोकांमध्ये स्कीन कॅन्सरचा धोका अधिक राहतो. हा रिसर्च जामा स्कीन सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून हा रिसर्च बोस्टनमधील ब्रिघम आणि महिला हॉस्पिटलने मिळून केलाय. 

या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, हेट्रोसेक्शुअल महिला आणि पुरूषांच्या तुलनेत गे आणि बायसेक्शुअल पुरूष व महिलांना स्कीन कॅन्सरचा धोका जास्त असतो. या रिसर्चसाठी अभ्यासकांनी मोबाइल फोनच्या माध्यमातून डेटा एकत्र केला. रिसर्चसाठी अभ्यासकांनी २०१४ पासून दरवर्षी चार लाख पाच हजार लोकांचे फोन इंटरव्ह्यू केलेत आणि त्या आधारावर डेटा जमा करून या निष्कर्षावर पोहोचले.

अभ्यासकांचं मत आहे की, गे पुरूषांना स्कीन कॅन्सरचा धोका ८.१ टक्के तर बायसेक्शुअल पुरूषांमध्ये हा धोका ८.४ टक्के जास्त राहतो. तेच हेट्रोसेक्शुअल पुरूषांमध्ये स्कीन कॅन्सरचा धोका गे लोकांच्या तुलनेत ६.७ टक्के आणि हेट्रोसेक्शुअल महिलांमध्ये लेस्बियन महिलांच्या तुलनेत ६.६ टक्के जास्त राहतो.

तेच गे आणि बायसेक्शुअल महिलांमध्ये हा धोका ५.९ टक्के आणि ४.७ टक्के राहतो. या रिसर्चसाठी अभ्यासकांनी लोकांना त्यांची सेक्शुअल ओरेंटेशन आणि जेंडर विचारले. त्यानंतर डेटा जमा केला आणि त्यातून हे समोर आले की, सामान्य लोकांच्या तुलनेत गे आणि बायसेक्शुअल पुरूष आणि महिलांना स्कीन कॅन्सरचा धोका अधिक राहतो.

स्कीन कॅन्सरची समस्या अलिकडे वेगाने वाढत आहे. त्वचेच्या कोशिका जेव्हा असामान्य रूपाने विकसित होत असतील तर स्कीन कॅन्सर होऊ शकतो. शरीरातील ज्या भागावर सूर्याची किरणे थेट पडतात, त्या भागावरही स्कीन कॅन्सर होण्याचा धोका अधिक राहतो. यात स्कीनमध्ये बदल बघायला मिळतो. उन्हात गेल्यावर अंगावर खाज येऊ लागते. ही काही स्कीन कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे आहेत.


Web Title: Study says Gay and Bisexual men are more likely to get skin cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.