हिरड्यांच्या समस्यांनी पीडित लोकांना हाय ब्लड प्रेशरचा धोका - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 02:53 PM2019-09-26T14:53:55+5:302019-09-26T14:57:43+5:30
हृदयरोगांच्या प्रमुख कारणांमध्ये हाय ब्लड प्रेशर सुद्धा आहे. अशात हिरड्यांशी संबंधित आजाराला हार्ट अटॅकच्या वाढत्या रिस्कसोबत लिंक केलं गेलं आहे.
एका नव्या रिसर्चमधून समोर आले आहे की, हिरड्यांच्या समस्येने पीडित लोकांना हाय ब्लड प्रेशर होण्याचा धोका अधिक असतो. एका रिपोर्टुनुसार, हाय ब्लड प्रेशरची समस्या ४५ टक्के तरूण लोकांना प्रभावित करते आणि ही समस्या जगभरात अकाली निधनासाठी कारणीभूत ठरत आहे. तर हिरड्यांसंबंधी आजार म्हणजेच पेरिओडोन्टिक जगभरातील अर्ध्या लोकसंख्येला प्रभावित करत आहे.
हृदयरोगांच्या प्रमुख कारणांमध्ये हाय ब्लड प्रेशर सुद्धा आहे. अशात हिरड्यांशी संबंधित आजाराला हार्ट अटॅकच्या वाढत्या रिस्कसोबत लिंक केलं गेलं आहे. जर्नल कार्डिओवस्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित ताज्या माहितीनुसार, गम डिजीज म्हणजे हिरड्यांशी संबंधित आजाराने ग्रस्त लोकांना हाय बीपीचा धोका अधिक असतो.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या इस्टमॅन डेंटल इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांचं म्हणणं आहे की, पेरिओडोन्टिकने पीडित लोकांमध्ये हाय ब्लड प्रेशरची शक्यता अधिक राहत असल्याने त्यांच्या नुकसानाबाबत सांगितलं गेलं पाहिजे. त्यासोबतच त्यांना हेल्दी डाएट आणि व्यायाम करण्याचाही सल्ला दिला गेला पाहिजे.
प्राध्यापकांनी पुढे सांगितले की, पेरिओडोन्टिकच्या रूग्णांना हाय ब्लड प्रेशरमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. ते म्हणाले की, याआधीच्या रिसर्चमध्ये पेरिओडोन्टिक आणि हाय ब्लड प्रेशरचा संबंध जाणून घेता आला आणि डेंटल ट्रिटमेंटने ब्लड प्रेशरमध्ये सुधारणा होऊ शकते. पण अजून याचा निष्कर्ष निघू शकला नाही.
गम डिजीजमध्ये हाय ब्लड प्रेशरची गडबडीची तपासणी करण्यासाठी २६ देशांमध्ये एकूण ८१ रिसर्चच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. यातून समोर आलेल्या निष्कर्षातून जाणून घेता आलं की, हिरड्यांच्या समस्यांनी कमी पीडित लोकांना हाय ब्लड प्रेशरचा धोका २२ टक्के होता, तर अधिक समस्या असणाऱ्यांना हाय ब्लड प्रेशरचा ४९ टक्के धोका होता.