कोलेस्ट्रॉल कमी झाल्यास हॅमरेजिक स्ट्रोकचा धोका, जाणून घ्या कसं ठेवाल नियंत्रणात?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 10:56 AM2020-01-31T10:56:37+5:302020-01-31T10:56:43+5:30
सामान्यपणे २० वयानंतर लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढण्यास सुरुवात होते. कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल वॅक्स किंवा मेणासारखा एक पदार्थ असतो.
सामान्यपणे २० वयानंतर लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढण्यास सुरुवात होते. कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल वॅक्स किंवा मेणासारखा एक पदार्थ असतो. कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातील पेशी आणि हार्मोन्सच्या निर्मितीसाठी महत्त्वाचं असतं. त्यासोबतच शरीर योग्यप्रकारे काम करण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉलचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे. तसेच कोलेस्ट्रॉल कमी होऊनही चालत नाही. कोलेस्ट्रॉल कमी झाल्यासही वेगवेगळ्या समस्या होतात.
कोलेस्ट्रॉल स्तर वाढल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जसे की, आर्टरी ब्लॉकेज, स्टोक्स, हार्ट अटॅक आणि हृदयाचे इतर आजार. जेव्हा आपल्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, आपलं शरीर काही संकेत देतं. हे संकेत समजून घेऊन वेळीच ब्लड टेस्ट करावी आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून सुटका मिळवावी.
काय होईल समस्या?
(Image Credit : health.harvard.edu)
कोलेस्ट्रॉलचा थेट संबंध हा हृदयाशी असतो. पण एका नव्या रिसर्चमधून हे समोर आले आहे की, जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकच कमी झालं तर याने हॅमरेजिक स्ट्रोक म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्त्रावाचा आघात होण्याचा धोका वाढतो.
एका रिसर्चनुसार, कोलेस्ट्रॉल फारच कमी झालं तर हॅमेरेजिक स्ट्रोकचा धोका १६९ टक्के अधिक होतो. अमेरिकेत जास्तीत जास्त मृत्यूचं मुख्य कारण हृदयासंबंधी आजार आहे. केवळ अमेरिकेतच नाही तर भारतातही हृदयरोगाच्या रूग्णांची संख्या कमी नाही. दरवर्षी अनेक लोकांचा जीव वेगवेगळ्या हृदयरोगांमुळे जातो.
९६ हजार लोकांवर रिसर्च
या रिसर्चमध्ये ९६, ०४३ लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना ना कधी हार्ट अटॅक आला ना कधी स्ट्रोकची ना कॅन्सर होता. रिसर्च सुरू करण्यापूर्वी या लोकांचं एलडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण मोजण्यात आलं. त्यानंतर सलग ९ वर्षे या लोकांचं कोलेस्ट्रॉल मोजण्यात आलं. अभ्यासकांनुसार, या रिसर्चच्या परिणामांमधून कोलेस्ट्रॉल, हृदयरोग आणि हॅमरेजच्या केसेससोबत निपटण्यास चांगलीच मदत झाली.
कोलेस्ट्रॉल कसा कराल मॅनेज?
- अनेकांना जंक फूड आवडतं. मात्र यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.
- कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी भाज्यांमध्ये कमी तेल वापरा.
- उकडलेल्या भाजा खाल्ल्यास ते जास्त उत्तम. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील.
- चहा, कॉफी, मिल्क शेक प्या. त्यासाठी लो फॅट असलेलं दूध वापरा. क्रीम आणि प्रक्रिया केलेली डेअरी उत्पादनं टाळा.
- कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा.