सकाळचा आळस दूर करण्याचा अन् दिवसभर फ्रेश राहण्याचा फंडा, हे एकदा करून बघाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:27 AM2020-02-05T11:27:02+5:302020-02-05T11:34:25+5:30

सकाळी सकाळी झोपेतून कामावर जाणं तसं तर कुणाला आवडत नाही. कारण सकाळीच चांगली साखर झोप लागलेली असते. पण काय करणार मन मारून सकाळी उठावं लागतं.

Study says musical alarms can be helpful in reducing morning laziness and making mood happy | सकाळचा आळस दूर करण्याचा अन् दिवसभर फ्रेश राहण्याचा फंडा, हे एकदा करून बघाच!

सकाळचा आळस दूर करण्याचा अन् दिवसभर फ्रेश राहण्याचा फंडा, हे एकदा करून बघाच!

googlenewsNext

(Image Credit : eventbrite.co.uk)

सकाळी सकाळी झोपेतून कामावर जाणं तसं तर कुणाला आवडत नाही. कारण सकाळीच चांगली साखर झोप लागलेली असते. पण काय करणार मन मारून सकाळी उठावं लागतं आणि ऑफिससाठी तयार व्हावं लागतं. अनेकजण सकाळी उठतात पण काहींना सकाळी झोपेतून उठणं फारच कठिण होऊन जातं. त्यामुळे हे लोक अलार्म बंद करून पुन्हा झोपतात. झोप मोडून उठावं लागल्याने दिवसही फार काही चांगला जात नाही. पण यावर एक रिसर्च नुकताच करण्यात आलाय.

(Image Credit : cosmopolitan.com)

जर सकाळी तुमची झोप होत नसेल आणि त्यामुळे सुस्ती, आळस जाणवत असेल. फ्रेशनेस वाटत नसेल तर सुमधूर संगीताचा अलार्म तुमची मदत करू शकतो. जर झोपेतून उठण्यासाठी तुम्ही सुमधूर संगीत असलेला अलार्म लावला तर याने तुमची सुस्ती तर जाईल तसेच आळसही दूर होऊन दिवसभर मूड चांगला राहील.

(Image Credit : steemit.com)

‘पीएलओएस वन’ नावाच्या जर्नलमध्ये एक रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. हा रिसर्च ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी केलाय. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, म्युझिकल अलार्म ऐकून जर व्यक्ती झोपेतून जागा होत असेल तर याने त्या व्यक्तीच्या सजगतेचा स्तर वाढेल म्हणजे ती व्यक्ती जास्त अलर्ट राहू शकते.

(Image Credit : medium.com)

ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी युनिव्हर्सिटीमध्ये असोसिएट प्रोफेसर एडरियान डायर म्हणाले की, 'झोपेत उठल्यावर बिप बिप असा किंवा कर्कश आवाज ऐकून मेंदूची गतिविधी भ्रमित होते. तर सुमधूर आवाजाच्या व्हायब्रेशनने आपण चांगल्या प्रकारे झोपेतून उठू शकतो'.

(Image Credit : success.com)

रिसर्चमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, म्युझिकल अलार्म ऐकून उठणे त्या लोकांसाठी खास ठरू शकतं जे लोक उठल्यावर जास्त मेहनतीच्या किंवा जास्त स्ट्रेस असलेल्या कामावर जातात. या सुमधूर संगीताने तुमचं डोकं शांत राहील आणि तुमचा दिवसही चांगला जाईल.


Web Title: Study says musical alarms can be helpful in reducing morning laziness and making mood happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.