मोठं यश! डासांच्या थूंकीपासून तयार केली जाईल सुपर वॅक्सीन, थांबेल जगभरातील महामारी...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 12:42 PM2020-06-12T12:42:15+5:302020-06-12T12:42:26+5:30
साधारण 5 वर्षांआधी डासांनी भरलेल्या एका ऑफिसमध्ये बसलेल्या जेसिका मॅनिंग यांच्या डोक्यात एक मोठी वेगळी आयडिया आली.
सध्या जगभरात कोरोना व्हायरसची वॅक्सीन बनवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. अशातच एका वेगळ्या वॅक्सीनची माहिती समोर आली आहे. साधारण 5 वर्षांआधी डासांनी भरलेल्या एका ऑफिसमध्ये बसलेल्या जेसिका मॅनिंग यांच्या डोक्यात एक मोठी वेगळी आयडिया आली.
जेसिका मॅनिंग यांनी विचार केला की, मलेरियाची वॅक्सीन शोधण्याऐवजी डासांपासून तयार होणाऱ्या सर्वच विषाणूंना नष्ट करण्यासाठी एकत्र एक प्रयत्न केला जावा. अमेरिकेतील संसर्गजन्य रोग संस्थेत काम करणाऱ्या वैज्ञानिक जेसिका यांचं मत आहे की, डासांच्या लाळेत आढळणाऱ्या प्रोटीनपासून एक वैश्विक वॅक्सीनचं निर्मित केली जाऊ शकते.
जर वॅक्सीन तयार करण्यात यश मिळालं तर मनुष्याच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या सर्वच विषाणूंपासून होणाऱ्या आजारांपासून रक्षण होईल. यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, झीका, यलो फीवहर, मायरो इत्यादी रोगांपासून मनुष्याचा बचाव होऊ शकतो.
जेसिका म्हणाल्या की, 'आपल्याला आणखी जास्त रचनात्मक पद्धती वापराव्या लागतील'. ही वॅक्सीन फार उपयोगी ठरेल ज्याने अनेक आजारांपासून बचाव होईल.
गुरूवारी प्रसिद्ध लान्सेट जर्नलमध्ये जेसिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा रिसर्च प्रकाशित झाला. यात डासांच्या थूंकीपासून तयार केलेल्या वॅक्सीनच्या पहिल्या क्लीनिकल ट्रायल परिणामाबाबत सांगण्यात आले. या ट्रायलमधून हे कळून येतं की, डासांच्या लाळेपासून तयार वॅक्सीन Anopheles सुरक्षित आहे. याने अॅंटीबॉडी तयार होते आणि कोशिकांचा रिस्पॉन्स मिळतो. एक वैज्ञानिक मायकल मॅकक्रॅकन म्हणाले की, प्राथमिक परिणाम चांगले आहेत.
मॅकक्रकन म्हणाले की, 'हे फार मोठं यश आहे. डास हे पृथ्वीवरील सर्वात घातक जीवांपैकी एक आहेत'. केवळ मलेरियाने दरवर्षी 4 लाख लोकांचा जीव जातो. यातील जास्तीत जास्त मृत्यू गरीब देशांमध्ये होतात, जिथे वॅक्सीनच्या शोधावर फार काम होत नाही. आणि त्यासाठी पैसाही दिला जात नाही. ग्लोबल वार्मिंगमुळे आता डास आणखी जास्त देशांमध्ये आपली पोहोच वाढवत आहेत.
जगात कोरोना व्हायरसच्या थैमानात आता वैज्ञानिक आपला फोकस संसर्गजन्य आजारांवर आणि वॅक्सीनच्या शोधावर करत आहेत. खासकरून त्या विषाणूंवर फोकस आहे जे डासांव्दारे पसरतात. असे मानले जाते की, कोरोना व्हायरस वटवाघळांमधून पसरला होता आणि आता जगभरात 74 लाख लोकांना याची लागण झाली आहे. तर 4 लाख 20 हजारांपेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला.