पुरूषांसाठी फारच फायदेशीर असते ही फळभाजी, प्रोस्टेट कॅन्सरचा धोका करते कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 04:27 PM2022-09-26T16:27:58+5:302022-09-26T16:49:24+5:30

prostate cancer : पुरूषांमध्ये अक्रोडच्या आकाराची असलेली ही ग्रंथी शुक्राणूंसंबंधी तरल पदार्थ तयार करते. 

Study says tomato may lower risk prostate cancer | पुरूषांसाठी फारच फायदेशीर असते ही फळभाजी, प्रोस्टेट कॅन्सरचा धोका करते कमी

पुरूषांसाठी फारच फायदेशीर असते ही फळभाजी, प्रोस्टेट कॅन्सरचा धोका करते कमी

Next

prostate cancer : सध्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे जगभरातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका वाढला आहे. त्यात पुरूषांमध्ये सर्वात जास्त आढळणारा कॅन्सर म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर. पुरूषांमध्ये अक्रोडच्या आकाराची असलेली ही ग्रंथी शुक्राणूंसंबंधी तरल पदार्थ तयार करते. 

प्रोस्टेट कॅन्सरची स्टेज फार पुढे गेल्यावर किंवा स्थिती अधिक वाईट झाल्यावर उपचारादरम्यान अनेकदा ही ग्रंथी काढावी लागते. पण एका नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, टोमॅटोच्या सेवनाने पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो.

express.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, यूकेच्या ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सोशल अ‍ॅन्ड कम्यूनिटी मेडिसीनने साधारण २० हजार पुरूषांच्या लाइफस्टाईलचा यासंबंधी अभ्यास केला. मेडिकल जर्नल कॅन्सर एपिडेमोलॉजी, बायोमार्कर्स अ‍ॅन्ड प्रिव्हेंशनमध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, जे पुरूष दर आठवड्यात अधिक टोमॅटोचं सेवन करतात, ते प्रोस्टेट कॅन्सरचा धोका २० टक्क्यांनी कमी करू शकतात.

या रिसर्चमध्ये आढळलं की, ज्या पुरूषांनी टोमॅटो कोणत्याही रूपात सेवन केलं असेल जसे की, कच्चा, भाजीतून किंवा टोमॅटो ज्यूस इत्यादी रूपात. या लोकांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका टोमॅटो न खाणाऱ्या लोकांपेक्षा कमी आढळला. रिसर्चच्या अभ्यासकांनुसार, टोमॅटोमध्ये कॅन्सरशी लढणारं लायकोपिन तत्त्व असतं. याने डीएनएची सुरक्षा होण्यासोबतच सेल डॅमेज होण्यापासूनही बचाव केला जातो.

सोबतच अभ्यासकांनी असेही सांगितले की, सध्या टोमॅटो किती प्रभावी आहे, हे स्पष्ट सांगता येणार नाही. हे तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत लॅबमध्ये याची क्लिनिकल ट्रायल घेतली जाणार नाही.

Web Title: Study says tomato may lower risk prostate cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.