अकाली मृत्यूचा धोका टाळण्यासाठी महिलांसाठी खास विगरस एक्सरसाइज, कशी करतात ही एक्सरसाइज?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 09:51 AM2019-12-10T09:51:53+5:302019-12-10T10:01:35+5:30
बदलत्या लाइफस्टाईलमुळे, लठ्ठपणामुळे लोक अलिकडे वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. अर्थातच या आजारांमुळे लोकांचं आयुष्य कमी होत आहे.
(Image Credit : thehealthy.com)
बदलत्या लाइफस्टाईलमुळे, लठ्ठपणामुळे लोक अलिकडे वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. अर्थातच या आजारांमुळे लोकांचं आयुष्य कमी होत आहे. बरं लोकांच्या निष्काळजीपणामुळे, असमजामुळे, आळशीपणामुळे वेगवेगळ्या समस्या अधिक वाढतात. आपल्याला काही होऊ शकत नाही, असा एक गैरसमज मनात बाळगून लोक वाट्टेल तसं जगत असतात.
काही लोक नियमित एक्सरसाइज करतात, पण काही लोक यासाठी अजिबातच वेळ देत नाहीत. पण एक्सरसाइजचा बराच फायदा लोकांना होऊ शकतो. एका रिसर्चमधून महिलांसंबंधी एक बाब समोर आली आहे. या रिसर्चमध्ये महिलांकडून केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या एक्सरसाइजचा त्यांच्या शरीरावर होणारा प्रभाव बघण्यात आला.
(Image Credit :independent.co.uk)
महिलांबाबत करण्यात आलेल्या या रिसर्चमधून समोर आलं आहे की, विगरस एक्सरसाइज म्हणजेच फार वेगाने, एनर्जी लावून केला जाणारा व्यायाम आणि फिजिकल अॅक्टिविटी महिलांमध्ये हृदयरोगांमुळे अकाली होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी करू शकते.
(Image Credit : chatelaine.com)
असं का होतं याचं उत्तर देताना वैज्ञानिकांनी सांगितले की, विगरस एक्सरसाइज हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यासाठी, ब्लड फ्लो रेग्युलेट करण्यासाठी तसेच याने अतिरिक्त फॅट शरीरात जमा होऊ दिला जात नाही. या कारणांमुळे महिलांमध्ये हार्ट डिजीज आणि कॅन्सरसारखे आजार होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. हा रिसर्च युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिऑलॉजी द्वारे आयोजित EuroEcho 2019 मध्ये सादर करण्यात आला.
(Image Credit : garagegympower.com)
या रिसर्चमधून समोर आले आहे की, ट्रेडमिलवर एक्सरसाइज करणाऱ्या किंवा नियमितपणे रनिंग करणाऱ्या महिलांमध्ये आर्टरीजसंबंधी समस्या होण्याचा धोका अजिबात नसतो. याने त्यांच्या हृदयाच्या माध्यमातून रक्तप्रवाह संपूर्ण शरीरात व्यवस्थित होत राहतो, ब्लॉकेज, क्लॉटींग, स्ट्रोकसारखे धोकेही फार कमी असतात.
(Image Credit : pinterest.com)
यूनिव्हर्सिटी हॉस्पिटल कॉरूना, स्पेनमधील आणि या रिसर्चचे मुख्य लेखक ज्यूस पेटेरियो यांच्यानुसार, जेवढा जास्त व्यायाम तुम्ही करू शकता, त्याने तुमची फिटनेस कायम राहून अकाली मृत्यूचा धोका कमी होतो. ज्या महिला नियमितपणे शारीरिक श्रम खासकरून व्यायाम, धावणे, जास्तीत जास्त वेगाने चालणे, वेगाने पायऱ्या चढणे-उतरणे करतात त्यांचा मृत्यू दर असं न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत ४ पटीने कमी असतो.