Heart Attack येऊन गेल्यावर हार्ट निरोगी ठेवण्यासाठी नवा उपाय, जाणून घ्या काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 10:03 AM2019-09-18T10:03:27+5:302019-09-18T10:27:50+5:30
जगभरात हृदयासंबंधी आजारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आणि या आजारातून मृत्यूचं प्रमाण देखील वाढलं आहे. जगभरात हार्ट अटॅक हे मृत्यूच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.
(Image Credit : independent.co.uk)
आरोग्याबाबत किंवा वेगवेगळ्या आजारांबाबत सहज जरी चर्चा केली तरी हार्टसंबंधी समस्या असलेल्या केसेसची चर्चा अधिक होताना बघायला मिळते. कारण जगभरात हृदयासंबंधी आजारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आणि या आजारातून मृत्यूचं प्रमाण देखील वाढलं आहे. जगभरात हार्ट अटॅक हे मृत्यूच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.
मात्र, जर तुम्हाला वेळेवर योग्य उपचार मिळाले तर जीव वाचवता येऊ शकतो. सामान्यपणे हार्ट अटॅकनंतर हार्टच्या मसल्स फारच कमजोर होतात. अशात एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, Vitamin E ने हार्ट अटॅकमुळे मांसपेशींचं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.
हा रिसर्च ऑस्ट्रेलियाच्या बेकर हार्ट अॅन्ड डायबिटीस इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आला. अभ्यासक पीटरचं मत आहे की, व्हिटॅमिन ई मधील अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅटी-इन्फ्लेमेटरी गुणांमुळे हे हार्टच्या मांसपेशींसाठी फायदेशीर आहे. सध्या हा रिसर्च उंदरांवर करण्यात आलाय. उंदरांना एल्फा टोकोफीरोल(व्हिटॅमिन ई चा सर्वात हेवी प्रकार) दिलं गेलं. त्यांच्या हार्टवर याचा प्रभाव बघितला गेला.
यात असं आढळून आलं की, व्हिटॅमिन ई दिल्यानंतर उंदरांचं हार्ट फंक्शन फार वाढलं आहे. यात खराब झालेल्या टिश्यू सुद्धा ठीक करण्याची क्षमता आहे. आता अभ्यासक मनुष्यांवर हा रिसर्च करण्याचा प्लॅन करत आहेत. एका अभ्यासकाने सांगितले की, सध्या असं कोणतंही औषध उपलब्ध नाही की, ज्याने हार्ट अटॅकनंतर डॅमेज झालेल्या मांसपेशी ठीक केल्या जाऊ शकतील. अशात या रिसर्चमुळे कार्डिऑलॉजिस्ट्समध्ये एक नवीन आशा निर्माण झाली आहे.
हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी सामान्य टिप्स
पुरेशी झोप
हॉवर्डच्या ७० हजार महिलांवर केलेल्या एका अभ्यासानुसार, झोप आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी जास्त फायद्याची आहे. या अभ्यासात आढळून आलं की, जे लोक रात्री एक तास अधिक झोप घेतात त्यांना हृदयाचे आजार इतरांच्या तुलनेत कमी असतात. तेच ७ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना हृदयाचे आजार होण्याची शक्यता अधिक असते.
कोलेस्ट्रॉल कमी करा
रक्तात अधिक प्रमाणात कोलेस्ट्रॉल असणे फार घातक आहे. याने हृदयासंबंधी आजार होऊ शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवा आणि सतत तपासणी करत रहा.
नियमित व्यायाम करा
नियमित व्यायाम करणे वजन कमी राहण्यास मदत होते. यामुळे मधुमेह होण्याचीही शक्यता कमी असते. मधुमेह असलेल्या लोकांना हार्टअटॅक येण्याची शक्यता अधिक असते.
फॅटपासून दूर रहा
जेवणातील तेलाचं प्रमाण कमी करून ताज्या हिरव्या भाज्या आणि फळांचं सेवन वाढवा. यातून तुम्हाला अॅंटी-ऑक्सीडेंट्स मिळतात. यामुळे कोलेस्ट्रोलचा प्रभाव कमी होतो. रोज भाज्या खाल्यास हृदय निरोगी राहतं. सोबतच जंक फूडचं सेवनही कमी करा. वेळेवर जेवण करणे अधिक चांगले.
धुम्रपान करू नका
सिगारेट ओढणे महिलांच्या हृदयासाठी फारच घातक आहे. मध्यम वर्गातील महिलांना तंबाखूमुळे हार्टअटॅक येऊन जीव गमवावा लागण्याचं प्रमाण हे ५० टक्के आहे. धुम्रपानामुळे हार्टअटॅक येण्याची शक्यता अधिक असते.
वजन नियंत्रित ठेवा
जर तुमचं वजन जास्त असेल तर तुमच्या हृदयावर अधिक दबाव पडतो. हृदयाचे ठोके अधिक वाढतात. वजन वाढण्याचं कारण असंतुलित आहार, व्यायाम न करणे हे आहेत. अशात इतरही काही गंभीर आजार होतात. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवा.
तणाव कमी करा
तणाव हार्ट अटॅक येण्याचं मुख्य कारण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न हे तणाव कमी करण्यासाठी केले पाहिजे. त्यासोबतच रोजच्या आहारातही काही बदल करायला हवेत.