शरीरातील या बदलामुळे 10 टक्के वाढतो हार्ट फेलिअरचा धोका, रिसर्चमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 12:40 PM2022-08-29T12:40:56+5:302022-08-29T12:41:44+5:30
Heart Failure : हृदयरोगांबाबत सांगायचं तर तुम्हाला वाचून धक्का बसेल की, कंबरेचा वाढता घेर हार्ट फेलिअरचा धोका वाढवू शकतो. हे आम्ही तर एका रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे.
Heart Failure : आजच्या काळात हृदयासंबंधी आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कमी वयाच्या लोकांमध्ये हा धोका जास्त वाढत आहे. यामागचं सर्वात मोठं कारण आहे आपली लाइफस्टाईल, डाएट आणि एक्सरसाइजची कमतरता. या तिन्ही कारणांमुळे लठ्ठपणा, डायबिटीस आणि हृदयरोगांचा धोका वाढतो. हृदयरोगांबाबत सांगायचं तर तुम्हाला वाचून धक्का बसेल की, कंबरेचा वाढता घेर हार्ट फेलिअरचा धोका वाढवू शकतो. हे आम्ही तर एका रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे.
बार्सिलोनामध्ये यूरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी कॉंग्रेसमध्ये प्रस्तुत ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चमधून सांगण्यात आलं की, कंबरेचा घेर वाढलेल्या लोकांमध्ये बारीक कंबर असलेल्या लोकांच्या तुलनेत हार्ट फेलिअरचा धोका 3.21 टक्के अधिक असतो. हा रिसर्च 13 वर्ष 4 लाख 30 हजार ब्रिटीश लोकांवर करण्यात आला.
मुख्य वैज्ञानिक डॉ. अयोडिपुपो ओगुंडाटे यांनी रिसर्चमध्ये या गोष्टीवर जास्त जोर दिला की, कंबरेच्या वाढत्या साइजवरून हे दिसून येतं की, तुमच्या शरीरात ट्रान्स फॅटचं प्रमाण किती जास्त आहे आणि तुमच्यासाठी हे किती नुकसानकारक असू शकतं.
एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, कंबरेचा वाढता प्रत्येक एक अतिरिक्त इंच हार्ट फेलिअरचा धोका 10 ते 11 टक्के वाढवू शकतो. त्यामुळे वैज्ञानिकाचं मत आहे की, वजन कमी करण्याच्या तुलनेत तुमचं बेली फॅट कंट्रोल करणं गरजेचं आहे.
ब्रिटीश हार्ट फाउंडेशनच्या लेखकांच्या मतानुसार, हार्ट फेलिअर एक जुनी आणि उपचार नसलेली एक स्थिती आहे. जी काळानुसार वाढत जात आहे. त्यामुळे हा धोका वाढवणाऱ्या सर्व कारणांना कंट्रोल करा आणि कंबरेचा घेर वाढण्यापासून रोखा. त्यासाठी लोकांनी नियमितपणे आपल्या कंबरेचा घेर चेक करावा आणि तो कंट्रोलमध्ये ठेवावा.