‘रोटाव्हायरस’ लसीकरण मोहिम यशस्वी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:31 AM2019-04-23T11:31:50+5:302019-04-23T11:32:34+5:30
महापालिका : डॉ.प्रकाश नांदापूरकर यांची कार्यशाळेत माहिती
धुळे : देशात दरवर्षी अतिसारमुळे ७८०० बाजकांचा मृत्यु सामोरे जावे लागते़ मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी ६ महिने ते २ वर्षे वयाच्या बाळांमध्ये रोटाव्हायर लस दिल्यास आजारपणावर मात करता येवू शकते अशी माहिती नाशिक येथील सर्व्हेलन्स मेडिकल आॅफिसर डॉ़ प्रकाश नांदापुरकर यांनी दिली़
शहरातील जुन्या महापालिकेच्या सभागृहात सोमवारी दुपारी रोटाव्हायर लसीकरणाबाबत आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांची कार्र्यशाळा घेण्यात आली़ यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ़ मधुकर पवार, आर सी एच अधिकारी डॉ़ जे़ सी़पाटील यांनी मार्गदर्शन केले़
पुढे बोलतांना नांदापुर म्हणाले की, ६ महिने ते २ वर्ष वयाच्या लहान मुलांना रोटाव्हायरसमुळे होणारे जुलाब सर्वसाधारणपणे दिसतात. यातही एक वर्षाच्या आतल्या बाळांमध्ये प्रादुर्भाव अधिक आढळतो. विशेष म्हणजे हा विषाणू स्वच्छता पाळल्यानंतरदेखील पसरू शकतो. रोटाव्हायरस लशीचा पहिला डोस वयाच्या ६ आठवडयानंतर देतात. काही कारणाने डोस न घेतल्यास पहिला डोस १६ आठवडयापर्यंत व शेवटचा डोस ३२ आठवडयापर्यंत देता येवू शकते़
चार वर्षांपूर्वी देशात झालेल्या अभ्यासानुसार जुलाब-उलट्यांमुळे रुग्णालयात भरती करावे लागणाºया ४० टक्के लहान मुलांच्या आजाराचे कारण रोटाव्हायरस असल्याचे समोर आले आहे़ बालकांचा मृत्युचा दर कमी करण्यासाठी रोटाव्हायरस या लसीचा समावेश करण्यात आला आहे़ शासनातर्फे आता नियमित लसीकरण कार्यक्रमात आता रोटाव्हायरस या लसचा समावेश करण्यात आला आहे़ ही लस खासगी रूग्णालयात ८०० ते १५०० रुपयापर्यंत मिळते़ मात्र शासनाकडून पुढील आठवड्यापासुन महापालिकेच्या आरोग्य केंद्रातुन मोफत दिली जाणार असल्याची माहिती कार्यशाळेत डॉ़ नांदापुरकर यांनी दिली़
सहज लस देता येवू शकते- डॉ़मधुकर पवार
रोटाव्हायरस लस घेतल्यानंतरही मुलांना या विषाणूमुळे होणारे जुलाब होतात, परंतु त्यांची तीव्रता खूप कमी असते, त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज भासत नाही. देशातील तीन कंपन्या या लशीच्या उत्पादनात असून ही लस तोंडावाटे देण्याची असल्यामुळे ती आरोग्य कर्मचाºयांना सहन देता येवू शकते असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ़मधुकर पवार यांनी सांगितले़
मोफत लसीकरण..
अतिसारमुळे होणाºया मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दिड महिना ते एक वर्ष वयोगटातील बालकांना ३ वेळा ही लस देण्यात मोफत देण्यात येणार आहे़