'या' कारणामुळे तरूणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; एक्सपर्ट्सनी सांगितले कारणं आणि उपाय
By Manali.bagul | Published: November 8, 2020 10:48 AM2020-11-08T10:48:44+5:302020-11-08T11:01:24+5:30
Health Tips in Marathi : सडन कार्डियाक अरेस्ट ही एक आपातकालीन वैद्यकीय स्थिती आहे ज्यात एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक कार्य करणे थांबवते ज्यामुळे ह्रदयाचा त्रास होऊ शकतो.
(image Credit- medical news today)
काही वर्षांआधी हार्ट अटॅक किंवा कार्डीएक अरेस्ट मोठा आजार समजला जात होता. सध्याच्या काळात तरूणांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. छातीत दुखण्यामुळे अचानक मृत्यू झाला. असं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. वैद्यकीय भाषेत त्याला सडन कार्डियक अरेस्ट म्हणतात. तरूणांमध्ये वाढणारं गंभीर आजारांचे प्रमाण घेता मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, साकेतचे सीनियर कार्डियोलॉजिस्ट डॉ. विवेक कुमार यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
सडन(अचानक) कार्डियक अरेस्ट म्हणजे काय?
डॉ. विवेक यांनी सांगितले की, सडन कार्डियाक अरेस्ट ही एक आपातकालीन वैद्यकीय स्थिती आहे ज्यात एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक कार्य करणे थांबवते ज्यामुळे ह्रदयाचा त्रास होऊ शकतो. हे धोकादायक असू शकते कारण लक्षणं दिसल्यानंतर 1 तासाच्या आत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
असा कार्डियाक अरेस्ट येण्याचा धोका कोणाला असतो?
30-35 वर्षे वयानंतर कोणालाही ह्रदयाच्या समस्यांचा धोका असू शकतो. सामान्यत: ज्या लोकांमध्ये हार्ट पंपिंगची क्षमता ४० टक्क्यांपेक्षा कमी असते. (हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता) त्यांना जास्त धोका असतो. तरूणांमध्ये ही बाब वाढण्याचे कारण ताण तणाव आहे. कोरोनाकाळात या आजाराचे प्रमाण वाढले असून कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतरही अनेकांना हृदयासंबंधी समस्या उद्भवल्या आहेत.
ह्रदयाचा झटका येण्यापासून बचाव करण्यासाठी महत्वाचे आहे की आपल्याला हृदयाशी संबंधित काही समस्या असल्यास आपण डॉक्टरांशी संपर्क साधा आणि ते तपासून घ्या. इकोकार्डियोग्राफी तपासणीद्वारे या रोगाची माहिती मिळवता येऊ शकते. ज्या लोकांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला आहे. ज्यांना आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास आहे किंवा अचानक छातीत दुखण्याप्रमाणे हृदयविकाराची इतर लक्षणे दिसली. तर त्वरित सर्व चाचण्या घेण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि सल्ला घ्यावा. ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी 'अशी' प्रभावी ठरतेय रेडिएशन थेरेपी, समजून घ्या उपचार पद्धती
जर हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे दिसली तर रुग्णास ताबडतोब रुग्णालयात दाखल करायला हवे. जेणेकरून त्याचा जीव वाचवता येऊ शकतो. तरुणांनी दैनंदिन जीवनात कमी ताण-घ्यावा, कोणत्याही प्रकारच्या हृदयाच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. जर एखाद्यास ही समस्या उद्भवली असेल तर डॉक्टरांच्या सल्लाने औषधांसह काही प्रमाणात जीवनशैलीत बदल बदल्यामुळे याप्रकारच्या समस्या टाळता येऊ शकतात. खोकण्यातून किती वेळात आणि कसा होतो कोरोनाचा प्रसार?; संशोधनातून खुलासा