रात्री अचानक 'बाळ' रडतेय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2016 10:35 AM2016-10-02T10:35:55+5:302016-10-02T16:05:55+5:30
जन्मताच बाळाचे रडणे ही सामान्य बाब आहे.
* बाळाला होणारा शारीरिक त्रास हे एक मुख्य कारण रडण्याचे असू शकते. याचबरोबर वातावरणातील तापमानात वाढ झाली किंवा तापमान कमी असेल तर बाळ झोपेतून जागी होऊन उठून रडतात.
* बाळाच्या झोपण्याची जागा आरामदायी नसेल तर बाळ अस्वस्थ होतो, त्यामुळे त्याला झोप येत नाही म्हणून तो रडतो.
* मुले थोडी मोठी झाली की, त्यांची भूकही वाढते. त्यांना लवक र भूक लागते. तसेच त्यांची झोपही काही प्रमाणात कमी होते. या कारणानेही बाळ मध्यरात्री रडतात.
* रात्री लावलेला डायपर ओला झाल्यास आणि तो वेळेवर बदलला नाही तर त्याचा त्रास होऊन ते रडतात.
* बºयाचदा रात्री बाळ एकटे झोपलेले असते. त्याच्याजवळ कोणी नसल्याने असुरक्षित वाटल्याने ते रडतात.