गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती?; चुकीच्या वेळी खाल्ल्यास आरोग्याचं गंभीर नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 02:55 PM2024-07-23T14:55:01+5:302024-07-23T15:02:22+5:30

लोकांना गोड खायला आवडतं, पण तुम्हाला माहितीय का, गोड खाण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी गोड खाल्ल्याने आरोग्याचं गंभीर नुकसान होतं.

sugar is bad for health but what is the best time to have sugary food | गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती?; चुकीच्या वेळी खाल्ल्यास आरोग्याचं गंभीर नुकसान

गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती?; चुकीच्या वेळी खाल्ल्यास आरोग्याचं गंभीर नुकसान

बहुतेक लोकांना गोड खायला आवडतं, पण तुम्हाला माहितीय का, गोड खाण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी गोड खाल्ल्याने आरोग्याचं गंभीर नुकसान होतं. बरेच लोक सकाळी उठल्यावर गोड खातात, तर बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी गोड पदार्थ खातात. हे असं करणं योग्य आहे का?, मिठाई खाण्याची योग्य वेळ कोणती? हे जाणून घेऊया...

सकाळी गोड पदार्थ खावा का?

सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे. हे बरोबर आहे. पण तुम्हाला माहित आहे का की सकाळी गोड खाल्ल्याने संपूर्ण दिवस खराब होतो. गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. त्यामुळे थकवा, चिडचिड, पोटदुखी अशा समस्या उद्भवतात. गोड पदार्थामध्ये प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमीन यासारख्या आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो. त्यामुळे शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होते.

गोड खाण्याची योग्य वेळ कोणती?

गोड खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणानंतरची असते. कारण दिवसभर शरीर आरामात कॅलरीज बर्न करतं. दुपारच्या जेवणानंतर तुम्ही मिठाई  किंवा एखादा गोड पदार्थ खाऊ शकता, परंतु सकाळी किंवा संध्याकाळी कधीही गोड खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

दुपारचं जेवण झाल्यावर १ तासानंतर गोड पदार्ख खावा पण रात्रीच्या जेवणानंतर लगेच खाऊ नये. त्यामुळे एखाद्याला अस्वस्थ वाटू शकतं. जेवणानंतर गोड खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. मिठाई खाल्ल्यानंतर काही वेळ चालणं खूप गरजेचं आहे.

गोड खाण्याचे तोटे

जास्त साखर खाल्ल्याने त्वचेवर पुरळ वाढतात. कारण शरीरातील साखरेची पातळी वाढली की जळजळ वाढते. त्यामुळे त्वचेवर पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स सारख्या समस्या उद्भवू शकतात. 
जास्त साखर खाल्ल्याने शरीरात जळजळ होण्याची प्रतिक्रिया निर्माण होते. त्यामुळे त्वचेला सूज येऊ लागते. यामुळे, आपल्या त्वचेमध्ये सोरायसिस आणि एक्जिमा सारख्या रोगांचा धोका लक्षणीय वाढतो. त्वचेवर जळजळ झाल्यामुळे त्वचेशी संबंधित इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. 
 

Web Title: sugar is bad for health but what is the best time to have sugary food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.