ऊसाच्या रसाने कॅन्सर, किडनी स्टोनसह अनेक गंभीर आजारांचा टळेल धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 03:47 PM2020-02-28T15:47:25+5:302020-02-28T15:54:32+5:30
हे फायदे वाचून जे ऊसाचा रस पित नाहीत ते लोक सुद्धा ऊसाच्या रसाचं सेवन करतील.
ऊसाचा रस तुम्ही नेहमी पित असाल. उसाच्या रसाच्या दुकानातील घुंगरांचा आवाज आपल्याला रस पिण्यासाठी खेचून नेत असतो. येता-जाता, रस्त्यांच्या कडेला अनेकदा तुम्ही ऊसाच्या रसाचा आस्वाद घेत असता. पण काही लोकांना गोड आवडत नसल्यामुळे ऊसाचा रस पित नाहीत. आज आम्ही तुम्हाला ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात.याबाबत सांगणार आहोत. हे फायदे वाचून जे ऊसाचा रस पित नाहीत ते लोक सुद्धा ऊसाच्या रसाचं सेवन करतील.
कॅन्सरपासून बचाव
ऊसाच्या रसात पोषक घटक असतात. त्याव्यतिरिक्त यात कॅन्सर होण्यापासून रोखणारे आवश्यक घटक असतात. तसचं किडनी स्टोनच्या समस्येला सुद्धा रोखण्याची क्षमता यात असते. ऊसात एंटी कॅन्सरचे गुण असतात. कॅन्सरच्या लक्षणांना वाढण्यापासून रोखतात.
किडनी स्टोनपासून बचाव
ऊसाचा रस प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते. अनेक डॉक्टारांकडून सुद्धा उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. ऊसाच्या रसात आम्लीय क्षमता असते. ज्यामुळे जर मुतखडा झाला असेल तर बाहेर पडण्यास मदत होते. मुत्रावाटे हा खडा बाहेर निघत असतो.
युरिनरी ट्रक इन्फेक्शन होतं कमी
अनेक महिलांना अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्या्च्या पध्दतीत झालेल्या बदलामुळे युरीनरी ट्रॅकचं इन्फेक्शन होत असतं. ऊसाच्या रसातील ड्युरेटिक गुणांमुळे या प्रकारचं इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो. शिवाय युरीनमध्ये होणारी जळजळ देखील कमी होते.
रक्ताची कमतरता भरून निघते
अनेक लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते. काहीवेळा एनीमिया सुद्धा असतो. या परिस्थितीत लाल पेशी कमी होत असतात. शरीरात रक्ताचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी ऊसाचा रस फायदेशीर ठरत असतो. तसंच जर तुम्ही व्यायाम करत असाल तर हाडांना मजबूती देण्यासाठी तसंच उर्जा देण्यासाठी ऊसाच्या रसाचे सेवन करणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर यामुळे दातांना इन्फेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत मिळते. (हे पण वाचा-लघवी थांबवून ठेवाल तर 'या' आजारांना पडाल बळी, जाणून घ्या किती वेळा लघवीला जाणं गरजेचं?)
रोगप्रतिकारकशक्ती वाढते
शरीरात पोषक घटकांची कमतरता असल्यामुळे सर्दी, ताप, खोकला यांसारखे आजार वारंवार होत असतात. जर तुम्ही नियमीत ऊसाच्या रसाचे सेवन केलं तर शरीरासाठी चांगलं असेल रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल. आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल. शरीरातील उष्णता कमी करून गारवा देण्यासाठी ऊसाच्या रसाचं सेवन करणं गरजेचं आहे. ( हे पण वाचा-जीवघेण्या आजारांपासून बचाव करणाऱ्या गुळवेलाचे फायदे वाचाल तर गोळ्या घेणं कायमचं विसराल!)